• Home
  • क्राईम
  • कागल तालुक्यातील व्हनाळी यात्रेत दोन गटांत मारहाण; अ‍ॅट्रोसिटीसह परस्परविरोधी गुन्हे दाखल
Image

कागल तालुक्यातील व्हनाळी यात्रेत दोन गटांत मारहाण; अ‍ॅट्रोसिटीसह परस्परविरोधी गुन्हे दाखल

प्रतिनिधी

कागल तालुक्यातील व्हनाळी या गावात काल रात्री ऑर्केस्ट्रा सुरू असताना दोन गटांत जोरदार वाद झाला. यातून परस्परांमध्ये बेदम मारहाण झाली. या प्रकरणी मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत दलित संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कागल पोलीस स्टेशनच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. यानंतर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तर दलित कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाल्याने हे प्रकरण तणावपूर्ण बनले आहे.

व्हनाळी गावांमध्ये यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम सुरू आहेत. काल रात्री कार्यक्रम सुरू होता. थोरपुरुषांची गाणी लावण्यावरून यात्रेमध्ये दोन गटांमध्ये वाद सुरू झाला. त्यावर गावातील प्रमुखांनी हे प्रकरण मिटवले. पण नंतर पुन्हा गैबी चौकामध्ये एकदा वाद सुरू झाला. यात्रेनिमित्त आतषबाजी आयोजित करण्यात आली होती. काही ठिकाणचे रस्त्यावरील दिवे बंद करण्यात आले होते. याच दरम्यान आधीचे प्रकरण पुन्हा तापले. त्यातून दोन गटांमध्ये बेदम मारहाण सुरू झाली. एकमेकांचे कपडे फाटेपर्यंत मारहाण झाली. कमालीचा तणाव पसरला. त्यानंतर गावातील दलित समाजाचे लोक तसेच तालुक्यातील दलित संघटनांचे कार्यकर्ते कागल पोलीस ठाण्यामध्ये जमले.

रात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्यांनी संबंधितांवर अ‍ॅट्रोसिटी गुन्हा दाखल करा , अशी मागणी सुरू ठेवली. तर काहीजणांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच याच मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू केले. पहाटे दहा जणांच्या विरोधात अ‍ॅट्रोसिटी गुन्हा दाखल केला असून आणखी आठ जणांची नावे निष्पन्न होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, फोनवरून धमकावल्या प्रकरणी एका दलित कार्यकर्त्याविरोधातही दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणामुळे कागल पोलिस ठाण्याच्या परिसरात रात्रभर तणाव दिसून आला.

Releated Posts

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026