• Home
  • क्राईम
  • सुरक्षारक्षकाच्या प्रसंगावधानामुळे एटीएममधून रोकड चोरणारा गजाआड
Image

सुरक्षारक्षकाच्या प्रसंगावधानामुळे एटीएममधून रोकड चोरणारा गजाआड

प्रतिनिधी

सुरक्षारक्षकाच्या प्रसंगावधानामुळे एटीएममध्ये शिरून रोकड चोरीचा प्रयत्न करणारा चोरटा गजाआड झाला. रविवार पेठेत फडके हौद चौकातील एका एटीएम केंद्रात ही घटना घडली. संतोष लक्ष्मण रौत (वय ३४, रा. पाटील गल्ली, बेळगाव, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत सुरक्षारक्षक पंकजकुमार यादव याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फडके हौद चौकात आयसीआयसीआय बँकेचे एटीएम केंद्र आहे. आरोपी संतोष रौत सकाळी सातच्या सुमारास एटीएम केंद्रात पैसे काढण्याच्या बहाण्याने शिरला. एटीएमची तोडफोड करून त्याने रोकड चोरीचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षक यादव याच्या लक्षात हा प्रकार आला. त्याने रौतला पकडले आणि त्वरित या घटनेची माहिती पोलिसांना दिली. रौतला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला अटक करण्यात आली असून, तोडफोडीत एटीएमचे २५ हजारांचे नुकसान झाले आहे. पोलीस हवालदार गणेश दळवी तपास करत आहेत.

Releated Posts

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026