• Home
  • क्राईम
  • उपनिरीक्षकाच्या मोटारीतून दोन किलो मेफेड्रोन जप्त
Image

उपनिरीक्षकाच्या मोटारीतून दोन किलो मेफेड्रोन जप्त

प्रतिनिधी

मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थासह अटक केलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके याच्या मोटारीतून आणखी दोन किलो ४०० ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. त्याला सकाळीच पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. पिंपळेनिलख रक्षक चौकात मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या नमामी झा या हॉटेल कामगाराला पोलिसांनी दोन कोटी रूपये किमतीचे मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थासह अटक केली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात मेफेड्रोन कोठून आणले याची विचारणा पोलिसांनी केल्यावर नमामीने निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक शेळके याचे नाव घेतले. चौकशी केली असता शेळकेचा सहभाग स्पष्ट झाला. त्याला ४४ किलो ७९० ग्रॅम किलो वजनाच्या ४४ कोटी ७९ लाख ८० हजार रुपयांचे मेफेड्रोनसह अटक करण्यात आली होती.

शेळकेला पोलीस कोठडीत सुनावण्यात आली असून सकाळीच त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अटकेदरम्यान उपनिरीक्षक शेळके याची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. चौकशी दरम्यान त्याच्या मोटारीत आणखी मेफेड्रोन असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोन किलो ४०० ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन शेळके याच्या मोटारीतून जप्त केले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून शेळके याची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.

Releated Posts

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026