• Home
  • क्राईम
  • मंगळसूत्र चोरणाऱ्या सख्या भावासह दागिने खरेदी करणारा अटकेत
Image

मंगळसूत्र चोरणाऱ्या सख्या भावासह दागिने खरेदी करणारा अटकेत

प्रतिनिधी

भोसरी परिसरातून महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणाऱ्या दोन सख्या भावांना आणि चोरीचे दागिने विकत घेणा-याला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून आठ तोळे सोने, दुचाकी असा चार लाख १५ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. अक्षय राजू शेरावत (वय २३), अजय राजू शेरावत (वय २२, दोघे रा. हिंगणगाव, हवेली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, अनिल अंकुश नानावत (वय ३९, रा. सणसवाडी, ता. शिरूर) याला चोरीचे दागिने खरेदी केल्याप्रकरणी अटक केली आहे.

भोसरीतील बोऱ्हाडेवाडीतून एका पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी हिसकावून नेले होते. याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास करत असताना चोरीचे दागिने विकण्यासाठी दोघेजण खडी मशीन रोडवर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा लाऊन अक्षय आणि अजयला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीचे दागिने अनिल नानावत याने खरेदी केल्याचे समोर आल्याने पोलिसांनी त्याला देखील अटक केली. या कारवाईमुळे एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील तीन आणि देहूरोड पोलीस ठाण्यातील एक असे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.

Releated Posts

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026