• Home
  • क्राईम
  • अकरावीची विद्यार्थिनी गर्भवती निघाली अन ‘ती’ घटना उघडकीस आली…
Image

अकरावीची विद्यार्थिनी गर्भवती निघाली अन ‘ती’ घटना उघडकीस आली…

प्रतिनिधी

एका तरुणाने अकरावीच्या विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. तिच्याशी जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गर्भवती झाली.पोट दुखत असल्याने डॉक्टरकडे गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ही घटना उघडकीस आल्यानंतर प्रतापनगर पोलिसात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी तरुणाला अटक केली. अभिनव रवी हाडके (२३) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

पीडित मुलगी अकराव्या वर्गात शिकते. ती रोज सकाळी अंबाझरी उद्यानात फिरायला जात होती. ऑक्टोबर २०२३ मध्ये तिची ओळख अभिनव याच्याशी झाली. दोघांमध्ये मैत्री झाली. अभिनवने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. तिला घरी घेऊन जात अश्लील चाळे केले. मुलीने विरोध केला असता अभिनवने लग्नाचे आमिष दाखविले. मुलीच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर अभिनव आणि मुलीच्या भेटीगाठी कमी झाल्या. काही दिवसांपूर्वी मुलीच्या पोटात दुखू लागले. तिने याबाबत आईला सांगितले. आई तिला डॉक्टरकडे घेऊन गेली. डॉक्टरने ती गर्भवती असल्याचे सांगितले. आईच्या पायाखालची जमीनच सरकली. चौकशीत अभिनवचे नाव समोर आले. अभिनव विरुद्ध पोलिसात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी लैंगिक अत्याचार आणि पोक्सो अ‍ॅक्ट च्या कलमान्वये गुन्हा नोंदवून अभिनवला अटक केली.

Releated Posts

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026