• Home
  • माझा जिल्हा
  • बारामती! जागतिक महिला दिना निमीत्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे ‘आनंदी पालकत्व ‘ विषयी भाग्यश्री तावरे यांचे व्याख्यान व माता पालक मेळाव्याचे यशस्वी आयोजन.
Image

बारामती! जागतिक महिला दिना निमीत्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे ‘आनंदी पालकत्व ‘ विषयी भाग्यश्री तावरे यांचे व्याख्यान व माता पालक मेळाव्याचे यशस्वी आयोजन.

प्रतिनिधी : फिरोज भालदार

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर ता. बारामती येथे मुख्याध्यापक ज्ञानदेव सस्ते व उपशिक्षक रेवननाथ सर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील महिला उपशिक्षिका सुनिता शिंदे व मनीषा चव्हाण यांनी जागतिक महिला दिनानिमित्त शाळेत विविध कार्यक्रम आयोजन करून माता पालकांना ‘आनंदी पालकत्व ‘ याविषयी सांगवी येथील सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या भाग्यश्री तावरे यांच्या व्याख्यानाचा लाभ माता पालकांना मिळाला .

सदरच्या व्याख्यानात त्यांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत पालकांचे योगदान, घरातीत वातावरणाचा बालमनावर होणारा चांगला -वाईट परिणाम, विद्यार्थी अनुकरणप्रिय असतात कळत नकळत कुटुंबात होणाऱ्या विविध गोष्टी अनुकरण करतात .माता पालकांनी मुलांच्या पालन पोषणात अभ्यासा बाबत जागृकता बाळगावी . निसर्ग हा पहिला पालक असून आपण मुलांना काय करू नको हे सांगतो परंतु काय करावे हे ही सांगता आले पाहिजे . बालकांशी संवाद साधावा, प्रतिसाद द्यावा . जिजाऊंनी स्वप्न पाहिले म्हणून राजे घडले .भावनांना विचाराची जोड देता आली पाहिजे .आपण जशी अपेक्षा करतो त्यासाठी कर्तव्य पालन ही करावे या विषयी अतिशय ओघवत्या भाषेमध्ये माता पालकांना मार्गदर्शन केले .

त्यांचा शाळेच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला .
कांबळेश्वर गावच्या सरपंच मंदाकिनी कानडे,ग्रामपंचायत सदस्या सीमा खलाटे,मंगल कुंभार ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा शितल कुंभार उपाध्यक्षा राजश्री आगवणे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला . जागतिक महिला दिनानिमित्त शाळेतील उपशिक्षिका सुनीता शिंदे व मनीषा चव्हाण यांनी महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान केला .त्याचबरोबर नव्याने शाळेमध्ये सुरू असलेला अबॅकस वर्ग मार्गदर्शक शितल भगत यांचा व नव्याने इयत्ता पहिली मध्ये दाखल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या खरात मॅडम यांचा महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला .

शाळेमध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असताना माता पालकांना बरोबर घेऊन विद्यार्थी हिताचे उपक्रम राबवून विद्यार्थी गुणवत्ता वाढीमध्ये मनापासून यशस्वी उपक्रम राबवणाऱ्या महिला शिक्षिका सुनीता शिंदे व मनीषा चव्हाण यांचा सरपंच व पदाधिकारी यांनी सन्मान करून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या .

महिला दिनानिमित्त सरपंच मंदाकिनी कानडे व शाळा व्यवस्थापन उपाध्यक्ष राजश्री आगवणे यांनी महिला दिनानिमित्त उपस्थित महिलांना गुलाब पुष्प देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या .

Releated Posts

सोलापुरात संत गजानन महाराज आणि सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या पालखी भेटीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

प्रतिनिधी सोलापुरात संत गजानन महाराज आणि सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या पालखी भेटीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.…

ByBymnewsmarathi Jul 19, 2026

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026