• Home
  • क्राईम
  • समलैंगिक असताना लपवून विवाह; महिलेच्या तक्रारीनंतर पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा
Image

समलैंगिक असताना लपवून विवाह; महिलेच्या तक्रारीनंतर पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा

प्रतिनिधी

मुलगा समलैंगिक असल्याचे लपवून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी नवविवाहित तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी पती, सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तक्रारदार तरुणी वडगाव शेरी परिसरात वास्तव्याला आहे. जुलै २०२२ रोजी तरुणीचा एकाशी विवाह झाला होता. विवाहानंतर पती समलैंगिक असल्याचे तिच्या लक्षात आले. याबाबत तिने सासू-सासऱ्यांकडे विचारणा केली.

तरुणीचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. मोटार घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी तिच्याकडे करण्यात आली. तरुणीला धमकाविण्यात आले. तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. कौटुंबिक हिंसाचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक रेवले तपास करत आहे.

Releated Posts

दोन गावठी पिस्तूल, एक रायफलसह आरोपी जेरबंद; माळेगाव पोलिसांची धडक कारवाई

प्रतिनिधी माळेगाव पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रांविरोधात कारवाई करत दोन गावठी पिस्तूल, एक रायफल, दोन जिवंत काडतुसे तसेच दोन काडतुसांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

रागाच्या भरात नातवाने आजोबांचा लोखंडी गजाने केला खून; आरोपी नातू पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी   शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे शेतातील व घरातील कामे सांगितल्याच्या रागातून २६ वर्षीय नातवाने ८४ वर्षीय…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

बारामतीत म्हशींच्या 12 रेडकांची क्रूर वाहतूक उघड; पिकअपसह चालकावर गुन्हा दाखल

सहसंपादक- अक्षय थोरात बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी परिसरात म्हशींच्या रेडकांची कथितपणे क्रूर व बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी एका…

ByBymnewsmarathi Jun 14, 2026

ऑनलाईन गेमिंगच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; पुणे पोलिसांनी मोठ्या सायबर रॅकेटचा पर्दाफाश

प्रतिनिधी ऑनलाईन गेम खेळून अल्पावधीत मोठी कमाई करून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या मोठ्या सायबर…

ByBymnewsmarathi Jun 13, 2026