Image

धावत्‍या मिनीबसवर गोळीबार

प्रतिनिधी

अमरावती शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांच्‍या समाधीचे दर्शन घेऊन नागपूर येथे परत जात असलेल्‍या नागरिकांच्‍या खासगी प्रवासी मिनीबसवर बोलेरोमधून आलेल्‍या अज्ञात हल्‍लखोरांनी केलेल्‍या गोळीबारात चार जण जखमी झाले आहे. ही थरारक घटना अमरावती-नागपूर राष्‍ट्रीय महामार्गावर रविवारी मध्‍यरात्रीच्‍या सुमारास शिवणगाव नजीक घडली. हल्‍ल्‍याचे कारण मात्र कळू शकलेले नाही.

नागपूर येथील भाविक पर्यटक एमएच १४ / जीडी ६९५५ क्रमांकाच्‍या १७ आसनी टेम्‍पो ट्रॅव्‍हलरमधून रविवारी शेगाव येथे दर्शनासाठी गेले होते. सायंकाळी ते शेगावहून परतीच्‍या प्रवासाला निघाले. त्‍यांचे वाहन अमरावतीहून नागपूरकडे जात असताना शिवणगाव ते टोलनाक्‍याच्‍या दरम्‍यान नागपूर येथून येत असलेल्‍या एका बोलेरो वाहनाने वळण घेऊन पर्यटकांच्‍या वाहनाचा पाठलाग सुरू केला. काही वेळाने बोलेरो वाहन समोर गेले आणि या वाहनातील हल्‍लखोरांनी टेम्‍पो ट्रॅव्‍हलरवर गोळीबार सुरू केला. यात एक गोळी चालक खोमदेव कवडे यांच्‍या हाताला स्‍पर्श करून गेल्‍याने ते जखमी झाले. चालकासह इतर चार जण या हल्‍ल्‍यात जखमी झाले आहेत. हल्‍लेखोरांनी चार गोळ्या झाडल्‍याची मा‍हिती मिळाली आहे.

गोळीबार केल्‍यानंतर हल्‍लेखोरांनी पुन्‍हा आपले वाहन वळवून मोर्शीच्‍या दिशेने त्‍यांनी पलायन केले. टेम्‍पो ट्रॅव्‍हलरच्‍या जखमी चालकाने प्रसंगावधान राखून वाहन रस्‍त्‍यात कुठेही न थांबवता थेट तिवसा पोलीस ठाण्‍यात आणले आणि या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी जखमींना प्राथमिक उपचारासाठी रुग्‍णालयात नेले आणि लगेच नियंत्रण कक्षाला कळवले. हल्‍लेखोर हे बोलेरो वाहनातून आले होते आणि त्‍यांनी तोंडाला दुपट्टे बांधलेले होते, अशी माहिती वाहनातील पर्यटकांनी दिली. या हल्‍ल्‍यामागे लुटमारीचा हेतू होता की अन्‍य कोणते कारण याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी हल्‍लेखोरांचा शोध सुरू केला आहे.

Releated Posts

कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; महामार्गावर बस लुटणारी टोळी गजाआड, सव्वा कोटींची चांदी जप्त

प्रतिनिधी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर धाडसी दरोडा टाकून कुरियर बसमधील सव्वा कोटींची चांदी लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा कोल्हापूर पोलिसांनी…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025

बारामतीत गुन्हेगारांची गय नाही! सराईत गुंडांवर तडीपारीची कुऱ्हाड; पोलिसांचा कडक पवित्रा

प्रतिनिधी ​दहशत माजवणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले; नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम बारामती शहर आणि तालुक्यात वारंवार गंभीर गुन्हे…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025

बारामतीत पोलिसांचा थरार; धारदार शस्त्रांसह सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

प्रतिनिधी ​दहशत पसरवण्याचा प्रयत्न फसला; पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई बारामती शहर आणि परिसरात दहशत माजवण्याच्या उद्देशाने घातक शस्त्रे…

ByBymnewsmarathi Dec 22, 2025

बारामतीत पोलिसांचा ‘महामोहीम’ तडाखा; गुणवडी, जळोचीसह नीरा वागजमधील अवैध धंदे उद्ध्वस्त

प्रतिनिधी ​१५ जणांवर गुन्हे दाखल; ५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त, गावठी दारूचे रसायन केले नष्ट बारामती शहर आणि…

ByBymnewsmarathi Dec 22, 2025