Image

अज्ञात चोरट्यांनी चाकुचा धाक दाखवत लुटले घर !

प्रतिनिधी – फिरोज भालदार

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील चोपडज गावामध्ये सौ. पुष्पलता बाळासाहेब जगताप रा. चोपडज यांच्या राहत्या घरी दिनांक 28. 11 .2022 रोजी रात्री दोन वाजताच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी घराच्या पाठीमागील सेफ्टी दरवाजे आतील कडी काढून घरात प्रवेश केला. व बेडरूम मध्ये येऊन एक उंच असलेल्या अज्ञात चोरट्याने पुष्पलता जगताप यांचे तोंड हाताने दाबून चाकूचा धाक दावून तुम चुप रहो आपके पास जो है वह हमे देदो असे हिंदीत बोलून दुसऱ्या अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील तीन तोळा वजनाचे सोन्याचे मनी मंगळसूत्र जबरदस्तीने कटरने कापून घेऊन दोन्ही हातातील पाच तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या काढून बेडरूम मध्ये असलेले लोखंडी कपाटातील हिरे, सोन्याचे व चांदीचे दागिने व रोख रक्कम ही 85 हजार रुपये असा एकूण 10. 77.500 रुपयांचा किमतीचा माल जबरदस्तीने चोरी करून चोरून नेला. पुष्पलता बाळासाहेब जगताप यांनी दोन अज्ञात चोरट्यांन विरोधात वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली असता फिर्यादीच्या फिर्याद वरून गुन्हा दाखल करण्यात आला . पुढील तपास स.पो.नि सोमनाथ लांडे सो हे करीत आहेत.

Releated Posts

उन्हाळ्याचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असतानाच लग्नसराईचा हंगाम मात्र जोरात सुरू आहे…

प्रतिनिधी (लेखन- सोपान कुचेकर) गावोगावी मंगल कार्यालये, बँड-बाजा, वाजंत्री आणि पाहुण्यांची लगबग पाहायला मिळत आहे… पहाटेपासून सुरू होणारी…

ByBymnewsmarathi May 13, 2026

हृदयसम्राट बाबा हरदेव सिंह यांना अर्पित ‘समर्पण दिवस’

प्रतिनिधी             मानवतेच्या कल्याणासाठी एखाद्या महान आत्म्याचे संपूर्ण जीवन समर्पित झाले की, त्या…

ByBymnewsmarathi May 12, 2026

नसरापूर येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराचा बारामती मध्ये तीव्र निषेध

प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे चार वर्षांच्या चिमुकलीवर झालेला अत्याचार आणि तिची निर्घृण हत्या या हृदयद्रावक…

ByBymnewsmarathi May 4, 2026

बारामतीत बाहेरच्या आमदारांची प्रचारासाठी खरंच गरज आहे का?”

प्रतिनिधी बारामती तालुक्यात सध्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. विविध पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असून, अनेक…

ByBymnewsmarathi Apr 19, 2026