• Home
  • क्राईम
  • भारतात घरफोड्या करणारी बांगलादेशी नागरिकांची टोळी अटकेत
Image

भारतात घरफोड्या करणारी बांगलादेशी नागरिकांची टोळी अटकेत

प्रतिनिधी

मुंबई आणि आसपासची शहरे आणि राज्यात अन्यत्र घरफोड्या करून बांगलादेशात जमीनजुमला खरेदी करणारा सराईत चोर व त्याच्या टोळीला जेरबंद करण्यात मुंबई गुन्हे शाखेला यश आले आहे. ही बांगलादेशी चोरांची टोळी जेरबंद झाल्याने घरफोडीचे शेकडो गुन्हे उघडकीस येतील, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. आरोपींनी भारतात चोऱ्या करून बांगलादेशात मालमत्ता खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

गुन्हे शाखेकडे दाखल घरफोडीच्या गुन्ह्यात शाकीर उर्फ गुड्डू हैदर शेख (४५) याचा गुन्हे शाखेचे मालमत्ता पथक गेल्या वर्षभरापासून शोध घेत होते. महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, हैदराबाद येथे शाकीरचा शोध घेण्यात येत होता. दरम्यान, शाकीर जालन्यात लपला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक तेथे रवाना झाले. शाकीर परतूर येथील एका दुमजली घरात वरच्या मजल्यावर लपल्याचे समजताच पथकाने पहाटेच्या वेळेस तेथे छापा टाकला. त्यावेळी तेथे शाकीरसह त्याचे अन्य सहा साथीदार पोलिसांच्या हाती लागले. त्यांच्याकडे घरफोडीसाठी लागणारे कटावनी, स्क्रु ड्रायव्हर, चॉपर, कोयता हे साहित्य सापडले. तसेच गुन्ह्यात वापरलेली एक मोटरगाडी देखील जप्त करण्यात आली. त्या सर्वांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.

चौकशीअंती मुख्य आरोपी शाकिरसह त्याचे अन्य चार साथीदार बांगलादेशी असल्याचे उघड झाले. मुळचा बांगलादेशी असलेला शाकीर १५ वर्षांपूर्वी मुंब्रा येथे आला आणि तेथेच तो राहू लागला. गेल्या दहा वर्षांपासून तो घरफोड्या करीत आहे. त्याला २९ गुन्ह्यांत अटक झाली असून १९ घरफोडी प्रकरणी पोलिसांत दाखल गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. शाकीरला चार गुन्ह्यांमध्ये शिक्षा झाली आहे. तर आठ गुन्ह्यांत त्याच्या विरोधात अजामिनपात्र, एका गुन्ह्यात जामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.

Releated Posts

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026