Image

पुणे जिल्ह्यात १०५१ बंदुकबाज

प्रतिनिधी

जीवाला धोका असणे, दररोज मोठ्या प्रमाणात रोख रकमेची हाताळणी करणारे किंवा स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सर्वांत जास्त शस्त्र परवाना घेणाऱ्यांमध्ये हवेली तालुका असून, त्याखालोखाल बारामती तालुका आहे. या सर्वांना लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर शस्त्रे जमा करावी लागणार आहेत.

शस्त्र परवाना देताना संबंधितांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र अत्यावश्यक आहे किंवा कसे, याची पडताळणी केली जाते आणि त्यानंतरच परवाना दिला जातो. एखाद्याच्या जीवाला धोका असल्यास किंवा धमकी आली असल्यास त्याची तीव्रता पाहून त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून परवाना देण्यात येत असतो. काहीजणांना दररोज मोठ्या प्रमाणात रोख रक्कम हाताळावी लागते. संबंधितांनाही सुरक्षितता म्हणून शस्त्र परवाना देण्यात येतो. शस्त्र परवान्यांचे नूतनीकरण करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून शस्त्र परवाना घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या महापालिकांच्या हद्दीतील नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून परवाने देण्यात येतात. जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत १०५१ जणांना शस्त्र परवाने दिले आहेत.

ग्रामीण पोलीस ठाण्यांकडे अर्ज केल्यानंतर सर्व अर्ज जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त होतात. अर्जांची पडताळणी केल्यानंतर संबंधितांना परवाने दिले जातात किंवा नाकारले जातात. वैयक्तिक पिस्तुल बाळगण्याचा परवाना मिळण्यासाठी येणाऱ्या अर्जांची संख्या मोठी असून कठोर पडताळणीनंतरच परवाने वितरीत करण्यात येतात. दिलेल्या परवान्यांपैकी दुपटीने परवाना देण्यासाठीचे अर्ज नाकारण्यात आले आहेत, असेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026