• Home
  • क्राईम
  • स्पर्धा परीक्षार्थी तरुणीची १५ लाखांची फसवणूक
Image

स्पर्धा परीक्षार्थी तरुणीची १५ लाखांची फसवणूक

प्रतिनिधी

ऑनलाइन टास्कच्या आमिषाने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची सायबर चोरट्यांनी १५ लाख ४७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत एका तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी नारायण पेठेतील एका वसतीगृहात राहायला असून, ती स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. सायबर चोरट्यांनी तिच्या मोबाइल क्रमाकांवर संदेश पाठविला होता. ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगले पैसे मिळतात. समाजमाध्यमातील जाहिरात, तसेच चित्रफितीस दर्शक पसंती मिळवून दिल्यास परतावा मिळेल. घरातून काम करण्याची संधी, असे आमिष चोरट्यांनी तरुणीला दाखविले होते.

सुरुवातीला तरुणीला सायबर चोरट्यांनी एक काम दिले. ऑनलाइन पद्धतीने तरुणीने काम केले. तिला चोरट्यांनी पैसे दिले. पैसे मिळाल्यानंतर तरुणीचा विश्वास बसला. तरुणीला जाळ्यात ओढून ऑनलाइन कामात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. तरुणीने वेळोवेळी नातेवाईक आणि कुटुंबीयांकडून पैसे घेऊन सायबर चोरट्यांच्या बँक खात्यात ऑनलाइन पद्धतीने जमा केली. तिने एकूण मिळून १५ लाख ४७ हजार रुपये चोरट्यांच्या खात्यात जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी मोबाइल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तरुणीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सायबर चोरट्यांनी संबंधित गुन्हा विश्रामबाग पोलिसांकडे तपासासाठी सोपविला. पोलीस निरीक्षक घोडके तपास करत आहेत.

Releated Posts

लोणी भापकर येथे कोयत्याने जीवघेणा हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणी भापकर (बोरघाट) येथे झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेसह…

ByBymnewsmarathi Jul 27, 2026

15 वर्षांनी न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय कस्टडीत मृत्यू प्रकरणात 9 पोलिसांना दिली जन्मठेप शिक्षा.

प्रतिनिधी पोलीस कोठडीत संशयिताचा मृत्यू झाल्याप्रकरणी वाशिमच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने 15 वर्षांनंतर ऐतिहासिक निर्णय देत रिसोड…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

अवैध हातभट्टी बंद… मात्र परवानाधारक दारूच्या अवैध विक्रीला उधाण?

प्रतिनिधी एक्साईज विभाग आणि पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष हडपसर परिसरात अवैध दारूच्या सेवनामुळे झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर राज्यभरात पोलिस…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीसह आश्रय देणाऱ्या इसमाला गुन्हे शाखा युनिट-५ कडून अटक!

प्रतिनिधी: वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का (MCOCA) गुन्ह्यात गेल्या १ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला आणि त्याला आश्रय…

ByBymnewsmarathi Jul 2, 2026