मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Tuesday, 6 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

पौड रस्त्यावर पीएमपीच्या धडकेत महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू

mnewsmarathi 17 Mar 2024 1 मिनिट वाचन 9,417 वाचन

प्रतिनिधी

पौड रस्त्यावर कचरा डेपो परिसरात पीएमपी बसच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वार तरुण जखमी झाला असून, पीएमपी चालकाविरुद्ध कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

माही मयूर गांधी (वय १९, रा. शोभा ऑप्टिमा बिल्डींग, माणिकबाग, सिंहगड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार मंदार नानावटी जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पीएमपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई अमोल नजन यांनी याबाबत कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार मंदार आणि त्याची मैत्रिण माही पौड रस्त्याने एमआयटी महाविद्यालयाकडे शनिवारी सकाळी सातच्या सुमारास निघाले होते. कचरा डेपोसमोर भरधाव दुचाकी घसरली. त्यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव पीएमपी बसच्या चाकाखाली माही सापडली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या माहीचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या पीएमपी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक बसवराज माळी तपास करत आहेत.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi