Skip to main content

  • Home
  • क्राईम
  • शहरात गोळीबारची तिसरी घटना, काडीपेटी न दिल्याने तरुणावर गोळीबार
Image

शहरात गोळीबारची तिसरी घटना, काडीपेटी न दिल्याने तरुणावर गोळीबार

प्रतिनिधी

शहरात गोळीबारांचे सत्र कायम आहे. नऱ्हे भागातील भूमकर चौकात मध्यरात्री एका तरुणावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. पुण्यात दोन दिवसांत गोळीबाराच्या तीन घटना घडल्या आहेत. एका बांधकाम व्यवसायिकावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी जंगली महाराज रस्त्यावर पिस्तूल रोखून गोळीबाराचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी घडली होती. त्यानंतर हडपसरमधील शेवाळवाडी परिसरात बुधवारी व्यवसायिक स्पर्धेतून एका निवृत्त लष्करी जवानाने एकावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या.

सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत भूमकर चौक परिसरात गुरुवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास एका तरुणावर गोळ्या झाडण्यात आल्या. गणेश गायकवड (रा. वारजे) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. काडीपेटी मागितल्याच्या कारणातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

मुंबईत अभिनेता सलमान खानच्या घराजवळ झालेल्या गोळीबाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी शहरातील गुन्हेगारांची झडाझडती घेतली होती. त्यानंतर शहरात गोळीबाराच्या तीन घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

Releated Posts

लोणीकंद गोळीबार व सोने चोरी प्रकरणातील फरार आरोपी मध्यप्रदेशमधून २४ तासांच्या आत जेरबंद

प्रतिनिधी लोणीकंद परिसरातील वाडेबोल्हाई येथे एका व्यावसायिकावर गोळीबार करून २२ तोळे सोने जबरीने चोरून नेणाऱ्या कुख्यात आरोपींना पुणे…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला तात्काळ अटक

 प्रतिनिधी :   वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तसेच जीवे मारण्याची धमकी देत…

ByBymnewsmarathi Aug 5, 2026

महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून मारहाण; लग्न होऊ देणार नाही, जीवे मारण्याची धमकी, तरुणावर गुन्हा

अक्षय थोरात: महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा रस्ता अडवणे, जबरदस्तीने स्कुटीवर बसण्यास भाग पाडणे, मारहाण करणे, हात…

ByBymnewsmarathi Aug 4, 2026

महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून मारहाण; लग्न होऊ देणार नाही, जीवे मारण्याची धमकी, तरुणावर गुन्हा

अक्षय थोरात: महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा रस्ता अडवणे, जबरदस्तीने स्कुटीवर बसण्यास भाग पाडणे, मारहाण करणे, हात…

ByBymnewsmarathi Aug 4, 2026