मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Tuesday, 6 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

भांडणे सोडवायला गेला अन् खून झाला… विश्रांतवाडीतील घटना

mnewsmarathi 05 May 2024 1 मिनिट वाचन 9,516 वाचन

प्रतिनिधी

शेजारी राहणाऱ्या दाम्पत्यातील वाद सोडविणे एकाच्या अंगलट आले. भांडणे सोडविणाऱ्या एकाला बेदम मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना विश्रांतवाडीतील धानोरी परिसरात घडली. प्रशांत नारायण शिंदे (वय ४५, रा. माधवनगर, धानोरी, विश्रांतवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अभय शेलार (वय ३३, रा. मुळा रस्ता, आदर्शनगर, खडकी) याच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत विनोद नारायण शिंदे (वय ४३) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी अभय शेलार आणि प्रशांत शिंदे शेजारी आहेत. शुक्रवारी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास अभयच्या आई-वडीलांचा वाद सुरू होता. त्याची आई प्रशांतच्या घरी आली. माझा नवरा वाद घालतो. त्याला समजावून सांगा, असे तिने प्रशांतला सांगितले. त्यानंतर प्रशांत अभयच्या घरी गेला. प्रशांतने त्याच्या वडिलांना समजावून सांगितले. प्रशांतने मद्यपान केले होते. मद्याच्या नशेत त्याने अभयच्या वडिलांना शिवीगाळ केली. त्यानंतर अभयच्या वडिलांनी या घटनेची माहिती अभयला दिली. त्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास अभय, त्याचे मित्र निखिल, अभिजीत, सुमित यांना घेऊन आला. त्या चौघांनी प्रशांतला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या प्रशांतला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच आरोपी अभय आणि त्याचे मित्र तेथून पसार झाले. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, विक्रांत देशमुख, सहायक आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मध्यरात्री चौघांना ताब्यात घेतले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन खंदारे तपास करत आहेत.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi