मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Thursday, 20 August 2026
|
महाराष्ट्र: ...
बाजार: SENSEX 81,100 ▲ NIFTY 24,800 ▲
M NEWS MARATHI

अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा एकमेव चॅनल

पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन ज्येष्ठावर तलवारीचे वार

mnewsmarathi प्रतिनिधी
May 9, 2024 1 मिनिटांचे वाचन 5001 वेळा पाहिले

प्रतिनिधी

पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन टोळक्याने एका ज्येष्ठावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना हडपसरमधील रामटेकडी परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पंजाबसिंग फौजीसिंग कल्याणी (वय ६५, रा. रामटेकडी, हडपसर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी रवीसिंग शामसिंग कल्याणी, हुकूमसिंग रामसिंग कल्याणी, रामसिंग मोहनसिंग कल्याणी, अजयसिंग हुकूमसिंग कल्याणी, ऐलानसिंग रामसिंग कल्याणी, जिंदालसिंग रामसिंग कल्याणी, हिंदूसिंग रामसिंग कल्याणी, राजूसिंग रामसिंग कल्याणी, निहालसिंग शामसिंग कल्याणी, सोनीहालसिंग शामसिंग कल्याणी, बसंतीकौर शामसिंग कल्याणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री पंजाबसिंग कल्याणी रामटेकडी परिसरात घरासमोर थांबले होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. पोलिसांना दरोडा टाकल्याची खोटी माहिती दिल्याचा आरोप करून त्यांनी पंजाबसिंग यांच्यावर तलवारीने हल्ला चढविला. त्यांच्या डोक्यात तलवारीने वार केला. त्यावेळी पंजाबसिंग यांचा नातू धनराजसिंग याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी त्याच्या हातावर तलवारीने वार केला.

आरोपींनी तलवारी उगारून दहशत माजविली, तसेच परिसरातील वाहनांची तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे, गुन्हे शाखेचे निरीक्षक करणकोट यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक सोनवणे तपास करत आहेत.

mnewsmarathi

हे लेखक M NEWS MARATHI साठी उत्कृष्ट पत्रकारिता करत आहेत.

सर्व लेख पहा