Skip to main content

  • Home
  • क्राईम
  • नाश्ता बनावला नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात मारला हातोडा
Image

नाश्ता बनावला नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात मारला हातोडा

प्रतिनिधी

महिलेने वेळेवर नाश्ता बनवला नाही म्हणून पतीने तिच्या डोक्यात हातोडा मारल्याचा गंभीर प्रकार कुर्ला परिसरात घडला आहे. आरोपी एवढ्यावरच थांबना नाही, तर त्याने पत्नीवर चाकू व स्कू ड्रायवरनेही हल्ला केला. या हल्ल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या ३४ वर्षीय पत्नीला कुर्ल्यातील भा.भा. रुगणालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. आरोपीविरोधात कुर्ला पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुडिया मोहम्मद फय्युम खान (३४) असे जखमी महिलेचे नाव आहे. कुर्ला पोलीस ठाण्याच्या पाठीमागे असलेल्या गणेश बाग लेन येथे गुडिया पती फय्युम जहीर खान (३८) याच्यासोबत राहत होत्या. गुडिया यांनी गुरूवारी वेळेवर नाश्ता बनवला नसल्यामुळे फय्युमने त्यांच्यासोबत वाद घालण्यास सुरूवात केली. संतापलेल्या फय्युमने शिलाई मशीनच्या शेजारी ठेवलेला हातोडा उचलून गुडिया यांच्या डोक्यात मारला. त्यानंतर घरातील चाकूने गुडिया यांच्या गळ्यावर तीन वार केले. तेवढ्यावरच तो थांबला नाही. तर त्याने घरातील स्क्रू डायवरने पत्नीच्या डोक्यावर मारले. त्यात गुडिया यांच्या भुवईवर गंभीर दुखापत झाली.

घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या गुडिया यांना तात्काळ कुर्ला येथील भा.भा. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर पोलिसांनी गुडिया खान यांचा जबाब नोंदवला. जबाबात त्यांनी पत्नीने हल्ला केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी हत्येच्या प्रयत्न व धमकावल्याप्रकरणी फय्युम खानविरोधात गुन्हा दाखल केला. हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून याप्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Releated Posts

लोणीकंद गोळीबार व सोने चोरी प्रकरणातील फरार आरोपी मध्यप्रदेशमधून २४ तासांच्या आत जेरबंद

प्रतिनिधी लोणीकंद परिसरातील वाडेबोल्हाई येथे एका व्यावसायिकावर गोळीबार करून २२ तोळे सोने जबरीने चोरून नेणाऱ्या कुख्यात आरोपींना पुणे…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला तात्काळ अटक

 प्रतिनिधी :   वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तसेच जीवे मारण्याची धमकी देत…

ByBymnewsmarathi Aug 5, 2026

महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून मारहाण; लग्न होऊ देणार नाही, जीवे मारण्याची धमकी, तरुणावर गुन्हा

अक्षय थोरात: महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा रस्ता अडवणे, जबरदस्तीने स्कुटीवर बसण्यास भाग पाडणे, मारहाण करणे, हात…

ByBymnewsmarathi Aug 4, 2026

महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून मारहाण; लग्न होऊ देणार नाही, जीवे मारण्याची धमकी, तरुणावर गुन्हा

अक्षय थोरात: महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा रस्ता अडवणे, जबरदस्तीने स्कुटीवर बसण्यास भाग पाडणे, मारहाण करणे, हात…

ByBymnewsmarathi Aug 4, 2026