मुख्य मजकुरावर जा
Monday, 14 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 12 May 2024 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
May 12, 2024 1 मिनिट वाचन 8,504 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी

साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर भागात घडली. रोहित सुभाष मंडाळकर (वय १२, रा. महापालिका शाळेसमोर, डीपी रस्ता, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे. शहर परिसरात शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला.

रोहित सायंकाळी सव्वासातच्या सुमारास हडपसर परिसरातील डीपी रस्त्याने निघाला होता. हँडबॉल स्टेडियमसमोर साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरला होता. तेथून निघालेल्या रोहितला विजेचा धक्का बसला. रोहित जागेवर बेशुद्ध पडला. बेशुद्धावस्थेतील रोहितला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

या घटनेची माहिती हडपसर पोलिसांना कळविण्यात आली. रोहितच्या मृत्युमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. शवविच्छेदनानंतर मृत्यूमागचे निश्चित कारण समजेल. प्राथमिक चौकशीत साचलेल्या पाण्यात वीजप्रवाह उतरल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती नागरिकांनी दिली. पाण्यात पडल्याने त्याच्या नाका तोंडात पाणी गेले होते, असे हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिली.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख