मुख्य मजकुरावर जा
Tuesday, 15 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 01 December 2022 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

मु. सा. काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .देविदास वायदंडे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर बिनविरोध निवड

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
December 1, 2022 1 मिनिट वाचन 8,520 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी- फिरोज भालदार

मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांची विद्यापीठाच्या आधी सभेवर प्राचार्य गटातून बिनविरोध निवड झाली. ही बाब महाविद्यालयाच्या शिरपेच्यात मानाचा तुरा ठरला आहे. गेल्या पाच वर्षात डॉ. वायदंडे हे शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून विद्यापीठाच्या आधीसभेवर सदस्य म्हणून कार्यरत होते. गेले वीस वर्षापासून डॉ . वायदंडे हे मु .सा .काकडे महाविद्यालयात म्हणून कार्यरत आहेत . विद्यापीठाच्या अनेक अधिकार मंडळावर त्यांनी काम केले आहे . अनेक सामाजिक, शैक्षणिक संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध आहे.तक्रार निवारण समिती, इतिहास अभ्यास मंडळ ,परीक्षा मुल्यमापन  समिती तसेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथ निवड सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोशारी यांच्या हस्ते त्यांना बेस्ट इनोव्हेटिव्ह टीचर म्हूणून त्यांना गौरवण्यात आले . त्यांच्या या निवडीबद्दल महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सह  महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीशराव काकडे ,महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजितभैया काकडे,सचिव प्रा जयवंतराव घोरपडे,सह सचिव श्री सतिश लकडे , महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे राज्यपाल प्रतिनिधी व व्यवस्थापन समिती सदस्य राजेश पांडे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख