मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Thursday, 20 August 2026
|
महाराष्ट्र: ...
बाजार: SENSEX 81,100 ▲ NIFTY 24,800 ▲
M NEWS MARATHI

अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा एकमेव चॅनल

ॲन्टॉप हिलमध्ये जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला, दोघांना अटक

mnewsmarathi प्रतिनिधी
May 25, 2024 1 मिनिटांचे वाचन 5001 वेळा पाहिले

प्रतिनिधी

एप्रिल महिन्यात झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एकावर चाकूने हल्ला केल्याची घटना गुरूवारी रात्री ॲन्टॉप हिल येथे घडली. याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना २९ मेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

विजयकुमार देवेंद्र याचा गेल्या महिन्यात मुर्गन देवेंद्र याच्याशी वाद झाला होता. तो राग डोक्यात ठेवून गुरूवारी रात्री १०.३० च्या सुमारास मुर्गन आणि वेलू देवेंद्र यांनी मक्कावाडी जंक्शन येथे दुचाकीवरून आलेल्या विजयला अडवले आणि चाकूने विजयच्या पोटावर वार केले. गंभीर जखमी झालेला विजय रस्त्यावर कोसळल्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला.

दरम्यान, हा प्रकार कळताच ॲन्टॉप हिल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विजयला तत्काळ शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून मुर्गन आणि वेलू या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले. दोघांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

mnewsmarathi

हे लेखक M NEWS MARATHI साठी उत्कृष्ट पत्रकारिता करत आहेत.

सर्व लेख पहा