Skip to main content

  • Home
  • क्राईम
  • प्रेयसीला भेटायला आलेल्या एक्स बॉयफ्रेंडला प्रियकराने कारने उडवले; बॉयफ्रेंड गंभीर जखमी
Image

प्रेयसीला भेटायला आलेल्या एक्स बॉयफ्रेंडला प्रियकराने कारने उडवले; बॉयफ्रेंड गंभीर जखमी

प्रतिनिधी

पिंपरी- चिंचवडमध्ये प्रेम प्रकरणातून एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला चार चाकी गाडीने उडवल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमध्ये निलेश शिंदे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुशील भास्कर काळे या आरोपीला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मध्यरात्री एकच्या सुमारास टेल्को रोड यशवंत नगर या ठिकाणी घडलेली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुशील भास्कर काळे आणि जखमी निलेश शिंदे या दोघांचं एकाच युवतीवर प्रेम आहे. परंतु, प्रेयसी ही सुशील भास्कर काळे याच्यावर प्रेम करते तर निलेश शिंदे हा आधी त्या युवतीचा प्रियकर होता. निलेश शिंदे हा युवतीला त्रास देत असल्याचं युवतीचे म्हणणं आहे. मध्यरात्री निलेश शिंदे हा एक्स गर्लफ्रेंड (प्रेयसीला) दुचाकी घेऊन भेटायला आला, याची कल्पना त्या युवतीने आरोपी सुशील भास्कर काळे याला दिली होती. जेव्हा टेल्को रोड या ठिकाणी रस्त्यावर निलेश शिंदे आणि सुशील भास्कर याची प्रेयसी बोलत थांबले, तेव्हा सुशील भास्कर याने भरधाव वेगातील चार चाकी गाडी निलेश शिंदेच्या अंगावर घातली. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. तातडीने त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यात आल.

याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपी सुशील भास्कर काळे याला अटक केली आहे. जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्या युवतीची पिंपरी पोलीस अधिक चौकशी करत आहेत. हा सर्व प्रकार प्रेमाच्या त्रिकोणातून घडल्याचं समोर आलेले आहे.

Releated Posts

लोणीकंद गोळीबार व सोने चोरी प्रकरणातील फरार आरोपी मध्यप्रदेशमधून २४ तासांच्या आत जेरबंद

प्रतिनिधी लोणीकंद परिसरातील वाडेबोल्हाई येथे एका व्यावसायिकावर गोळीबार करून २२ तोळे सोने जबरीने चोरून नेणाऱ्या कुख्यात आरोपींना पुणे…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला तात्काळ अटक

 प्रतिनिधी :   वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तसेच जीवे मारण्याची धमकी देत…

ByBymnewsmarathi Aug 5, 2026

महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून मारहाण; लग्न होऊ देणार नाही, जीवे मारण्याची धमकी, तरुणावर गुन्हा

अक्षय थोरात: महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा रस्ता अडवणे, जबरदस्तीने स्कुटीवर बसण्यास भाग पाडणे, मारहाण करणे, हात…

ByBymnewsmarathi Aug 4, 2026

महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून मारहाण; लग्न होऊ देणार नाही, जीवे मारण्याची धमकी, तरुणावर गुन्हा

अक्षय थोरात: महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा रस्ता अडवणे, जबरदस्तीने स्कुटीवर बसण्यास भाग पाडणे, मारहाण करणे, हात…

ByBymnewsmarathi Aug 4, 2026