मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Thursday, 20 August 2026
|
महाराष्ट्र: ...
बाजार: SENSEX 81,100 ▲ NIFTY 24,800 ▲
M NEWS MARATHI

अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा एकमेव चॅनल

नऱ्हे भागात दारुच्या नशेत सात दुचाकी पेटविल्या, दुचाकी पेटविणारा तरुण गजाआड

mnewsmarathi प्रतिनिधी
June 6, 2024 1 मिनिटांचे वाचन 5001 वेळा पाहिले

प्रतिनिधी

नऱ्हे भागात दारुच्या नशेत एका तरुणाने सात दुचाकी पेटवून दिल्याची घटना घडली. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. बबलू इस्लाम अन्सारी (वय १९, रा. अश्विनी अपार्टमेंटच्यामागे, चव्हाण चाळ, नऱ्हे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत ओंकार महेश धानेपकर (वय २४, रा. अश्विनी अपार्टमेंटजवळ, नऱ्हे) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी बबलू कामधंदे करत नाही. त्याला दारु पिण्याचे व्यसन आहे. अश्विनी अपार्टमेंटसमोर असलेल्या मोकळ्या जागेत परिसरातील रहिवासी वाहने लावतात. मंगळवारी (४ जून) मध्यरात्री बबलूने अश्विनी अपार्टमेंटसमोर लावलेल्या दुचाकी पेटवून दिल्या. या घटनेत दोन दुचाकी पूर्णपणे जळाल्या. पाच दुचाकींना झळ पोहोचली. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. तपासात आरोपी बबलू अन्सारीने दुचाकी पेटवून दिल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड तपास करत आहेत.

mnewsmarathi

हे लेखक M NEWS MARATHI साठी उत्कृष्ट पत्रकारिता करत आहेत.

सर्व लेख पहा