• Home
  • राजकीय
  • श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने पहिली उचल २८०० रु न देता हक्काची एक खकमी २९०४/- रू प्र.मे.टन FRP तात्काळ सभासदांच्या बँक खात्यावर व्याजासह वर्ग करावी :- श्री सतिश काकडे
Image

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने पहिली उचल २८०० रु न देता हक्काची एक खकमी २९०४/- रू प्र.मे.टन FRP तात्काळ सभासदांच्या बँक खात्यावर व्याजासह वर्ग करावी :- श्री सतिश काकडे

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि. सोमेश्वरनगर, ता. बारामती, जि.पुणे या कारखान्याचा सन २०२२-२३ चा गाळप हंगाम सुरू होवुन सव्वा महिना झालेला आहे. आजपर्यंत कारखान्याने २ लाख ८२ हजार मे. टन गाळप केलेले असुन आज कारखान्याकडे ३ लाख साखर पोती उपलब्ध आहेत आज साखरेचे दर ३८००/- ते ४०००/- रू प्रति क्विंटल आहेत. यानुसार कारखान्याकडे सुमारे १२० कोटी रूपये उपलब्ध होतात. तरीही सभासदांची सुमारे ८२ कोटी F.R.P रक्कम कारखाना देवु शकत नाही. ही रक्कम कारखाना बिनव्याजी वापरत आहे. कायद्या प्रमाणे गाळप झालेल्या उसाला १४ दिवसात F.R.P रक्कम पुर्ण देणे बंधनकारक आहे. परंतु मागील राज्य शासनाने दोन टप्यांमध्ये F.R.P रक्कम देण्याबाबत केंद्रास शिफारस केलेली होती परंतु केंद्राने याबाबत अध्यादेश न काढल्याने सोमेश्वर कारखान्यासह जिल्हयातील इतर कारखान्यांनी देखील पूर्ण F.R.P रक्कम देण्यास टाळाटाळ चालविली आहे. कोल्हापूर व सांगली जिल्हयातील कारखान्यांनी एकरक्कमी F. R.P पुर्वीप्रमाणे केंद्रसरकारच्या २२/२३ च्या सुधारीत परिपत्रकानुसार जुन्या पध्दतीने वाढीव दराने दिली आहे. परंतु सोमेश्वर कारखान्याने आजपर्यंत का F.R.P दिली नाही? कारखान्यास सभासदांचे बिनव्याजी पैसे वापरायचे होते का? परवा राज्य सरकारने F.R.P एक रक्कमी देण्याचे धोरण जाहीर केले आहे तरी कारखान्याने आपल्या कारखान्याच्या चांगल्या आर्थिक परिस्थिती नुसार एकरक्कमी F.R.P २९०४ /- प्र.मे.टन दि. १० डिसेंबर २०२२ अखेर सभासदांच्या बँक खात्यावर व्याजासह वर्ग करण्यात यावी अशी शेतकरी कृती समितीच्या वतीने लेखी मागणी दि. १/१२/२०२२ रोजी केली होती व त्याच दिवशी कारखान्याने घाईघाईत पहिली उचल २८००/- रू देवुन उसच्या पहिल्या उचलीची कोंडी फोडल्याची भासवुन सभासदांच्या डोळयात धुळफेक केलेली आहे.वास्तविक चालु हंगामाची F.R.P. केंद्र सरकारने दि. १७/८/२०२२ रोजी नोटीफिकेशन काढुन एकरकमी F.R.P ३०५० रू १०.२५ बेस धरून द्यावी. असे राज्य शासनासह कारखान्यांना कळविले आहे. (सोबत पत्र जोडत आहे.)सोमेश्वर कारखान्याने मागील ३ ते ४ वर्षात उच्चांकी भाव दिला आहे. तसेच चेअरमन कारखान्यावर कोणत्याही प्रकारचे थकीत कर्ज नाहीत नियमित कर्जे आहेत असे वारंवार सांगत आहेत. कारखान्याची नेट F.R.P २९०४ /- रु. प्रति मे.टन होत असुन सदर रक्कम एकरक्कमी सभासदांना मिळाल्यास सभासदांची सोसायट्यांची कर्ज एकरकमी भरता येतील व त्यामुळे जिल्हा बँकेच्या बिनव्याजी कर्जाचा त्यांना फायदा घेता येईल तसेच एकरक्कमी F. R.P रक्कमेमुळे वैयक्तिक कामे सभासदांना पुर्ण करता येतील. शाळा सुरू झाल्याने दुसऱ्या टप्यातील फी, शेतीच्या मशागती, उसाची बांधणी, बी-बियाणे खरेदी व लग्न सराई अशा अनेक गोष्टींना सभासदांना सामोरे जावे लागणार असल्याने त्यांना पैशांची आवश्यकता आहे.तसेच चालु वर्षी सन २०२२-२३ या गाळप हंगामात कारखाना जादा गाळप क्षमतेने गाळप होणार असुन साखरेचे, को-जन, उपपदार्थांचे जादा उत्पादन होत आहे. सध्या साखरेचे दर ४००० रू. क्विंटल चे वर आहेत. तसेच उपपदार्थांच्या दरामध्ये केंद्रसरकारने सरासरी १० ते १५ टक्के वाढ केलेली आहे. कारखान्याची आर्थिक परिस्थिती चेअरमन यांच्या म्हणण्याप्रमाणे भक्कम असल्याने मग कारखान्यास एकरक्कमी २९०४/- रू. प्रति मे.टन FRP व त्यावरील व्याज देण्यास काही अडचण येण्याचे कारणच नाही. तरी चेअरमन व संचालक मंडळाने एकरक्कमी FRP रक्कम दि. १० डिसेंबर अखेर सभासदांच्या बँक खात्यावर १५ टक्के व्याजासह वर्ग करण्यात यावी अन्यथा नाईलाजास्तव शेतकरी कृती समितीस कारखान्याचा काटा बंद करावा लागेल. व याची सर्वस्वी जबाबदारी चेअरमन व संचालक मंडळाची राहील.

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना २०२२/२३ F.R.P१०.२५ उतान्याला ३०५० रू केंद्राचा निर्धारीत भावसोमेश्वर कारखान्याची २१/२२ रिकव्हरी

११.९८५११.९८ – १०.२५ = १.७३१०.२५ = ३०५०रू

वरील प्रत्येक पॉईंटला

३०५ रू३०५ X १.७३ = ५२७.६५३०५० + ५२७.६५ = ३५७७.६५ ३५७७.६५ – ६७४.०२

२१ / २२ तोडणी वाहतुक = २९०३.६३रू F.R.Pनेट F.R.P २९०४ रूपये

Releated Posts

केंद्रात, राज्यात ‘ हिरो ‘ ; बारामतीत मात्र ‘ झिरो’….

प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त.. पार्टी विथ डिफरन्स म्हणवून घेणाऱ्या व जवळपास विरोधी…

ByBymnewsmarathi Feb 11, 2026

राज्यात निवडणुकीचा धडाका! १२ जिल्हा परिषदा अन् १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला रणसंग्राम

प्रतिनिधी  राज्यातील मिनी विधानसभा मानल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाने आज १२ जिल्हा…

ByBymnewsmarathi Jan 13, 2026

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी संभाजी होळकर यांची नियुक्ती

प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी संभाजी होळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्यावर ही…

ByBymnewsmarathi Jan 7, 2026

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा – प्रकृती कारणास्तव पदत्याग

प्रतिनिधी देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृती कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी २१ जुलै २०२५ रोजी…

ByBymnewsmarathi Jul 21, 2025