• Home
  • माझा जिल्हा
  • बारामती तालुक्यातील जि.प शाळेचा शिक्षण दर्जा ढासळला गटशिक्षण अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष?
Image

बारामती तालुक्यातील जि.प शाळेचा शिक्षण दर्जा ढासळला गटशिक्षण अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष?

संपादक मधुकर बनसोडे.

बारामती तालुका म्हणजे शिक्षणाची पंढरी मात्र याच बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाचा दर्जा निकृष्ट पद्धतीने ढासळलेला आहे? याला नक्की जबाबदार कोण बारामती तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद शाळेची तपासणी करतात का गटशिक्षण अधिकाऱ्यांचे जिल्हा परिषद च्या शाळेवरती लक्ष नसल्यामुळेच जिल्हा परिषद शाळेचा शैक्षणिक दर्जा ढासळत चाललेला आहे? अशी पालक वर्गातून चर्चा केली जात आहे. काही शिक्षकांनी खाजगीत बोलताना असे देखील सांगितले की शाळेत शिकवण्याचे काम कमी व शासनाची कामे जास्त असतात? त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांवरती पाहिजे तेवढे लक्ष देता येत नाही. याबाबत आम्ही लवकरच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, व शिक्षण मंत्री यांची भेट घेऊन निवेदन देणार आहोत. जर आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळा टिकवायची असेल तर सर्व पालकांनी जागरूक राहून जिल्हा परिषद शाळेवर ती लक्ष देणे गरजेचे आहे. भविष्यात जिल्हा परिषद शाळा बंद झाल्या तर खाजगी शिक्षण देणे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाही नाईलाज असतोव सर्वसामान्य कुटुंबातील मुलं शिक्षणापासून वंचित राहतील की काय? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

जेवढी जबाबदारी शिक्षकांची आहे तेवढीच जबाबदारी पालकांची देखील आहे हेही विसरून चालणार नाही. गट शिक्षण अधिकारी साहेब आपण आपले केबिन सोडून तालुक्यातील शाळेंवरती लक्ष केंद्रित करावे बारामती तालुक्यातील पालक वर्गातून मागणी.

Releated Posts

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026

बारामती तालुक्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा तीन दिवसीय अभ्यासवर्ग उत्साहात संपन्न

प्रतिनिधी  अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), बारामती तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेला तीन दिवसीय अभ्यासवर्ग दि. २६, २७…

ByBymnewsmarathi Jun 29, 2026