मुख्य मजकुरावर जा
Saturday, 22 August 2026

माळेगाव बु येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन*

प्रतिनिधी. बारामती, दि.२०: छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन व समुपदेशन मेळाव्याचे शरद संकुल सभागृह, अभियांत्रिकी महाविद्यालय माळेगांव बु. येथे शनिवार २२ जून रोजी…

mnewsmarathi वार्ताहर
June 20, 2024 1 मिनिट वाचन 5004 वाचन

प्रतिनिधी.

बारामती, दि.२०: छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन व समुपदेशन मेळाव्याचे शरद संकुल सभागृह, अभियांत्रिकी महाविद्यालय माळेगांव बु. येथे शनिवार २२ जून रोजी सकाळी १० वाजता आयोजन करण्यात आले आहे.

या शिबीरात इयत्ता १० वी व १२ वी नंतर करण्यात येणारे करिअर, भविष्यातील शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी, कौशल्य शिक्षणाचे महत्व, अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण, नोकरीसाठी मुलाखतीची तयारी, व्यक्तिमत्व विकास व बायोडाटा तयार करणे आदी विषयावर मार्गदर्शन करण्यात आहे.

विद्यार्थी व पालकांनी या शिबिरात सहभागी होऊन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माळेगांव बु चे प्राचार्य अवधुत जाधवर यांनी केले आहे.
0000

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी दर्जेदार पत्रकारिता करत आहेत.

सर्व लेख पहा