• Home
  • क्राईम
  • कर्मचाऱ्यांना मारहाण करून चोरट्यांनी पळवले केटरिंग साहित्य
Image

कर्मचाऱ्यांना मारहाण करून चोरट्यांनी पळवले केटरिंग साहित्य

प्रतिनिधी

केटरिंगचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण करून तीन ते चार जणांच्या गटाने केटरिंगचे साहित्ये पळवल्याची घटना चार दिवसांपूर्वी भांडूप परिसरात घडली. याबाबत एका कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून भांडुप पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

भांडुपच्या भगवती कार्यालयात मध्ये १९ जून रोजी पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. तेथे काम करणारे चार ते पाच कर्मचारी आणि येथील सुरक्षारक्षक नेहमी प्रमाणे झोपलेले असताना पहाटे चारच्या सुमारास तीन ते चारजण सभागृहात आले. त्यांनी पहिल्यांदा सुरक्षारक्षकाला मारहाण करून एका खोलीत बंद केले. त्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांनाही झोपेतून उठवून एका खोलीत बंद केले. त्यानंतर आरोपींनी केटरिंगसाठी असलेले सामान पळवले. जाताना आरोपींनी सभागृहातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरांच्या वायर देखील कापून टाकल्या होत्या. तसेच ही बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील आरोपींनी कर्मचाऱ्यांना दिली होती.

मात्र बाहेर पडल्यानंतर कर्मचाऱ्यांनी तत्काळ घडलेल्या घटनेची माहिती मालकाला दिल्यानंतर मालकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी भांडुप पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी एका कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Releated Posts

दोन गावठी पिस्तूल, एक रायफलसह आरोपी जेरबंद; माळेगाव पोलिसांची धडक कारवाई

प्रतिनिधी माळेगाव पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रांविरोधात कारवाई करत दोन गावठी पिस्तूल, एक रायफल, दोन जिवंत काडतुसे तसेच दोन काडतुसांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

रागाच्या भरात नातवाने आजोबांचा लोखंडी गजाने केला खून; आरोपी नातू पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी   शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे शेतातील व घरातील कामे सांगितल्याच्या रागातून २६ वर्षीय नातवाने ८४ वर्षीय…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

बारामतीत म्हशींच्या 12 रेडकांची क्रूर वाहतूक उघड; पिकअपसह चालकावर गुन्हा दाखल

सहसंपादक- अक्षय थोरात बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी परिसरात म्हशींच्या रेडकांची कथितपणे क्रूर व बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी एका…

ByBymnewsmarathi Jun 14, 2026

ऑनलाईन गेमिंगच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; पुणे पोलिसांनी मोठ्या सायबर रॅकेटचा पर्दाफाश

प्रतिनिधी ऑनलाईन गेम खेळून अल्पावधीत मोठी कमाई करून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या मोठ्या सायबर…

ByBymnewsmarathi Jun 13, 2026