मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

बारामती! पणदरे येथील दोघांना जबरी मारहाण : दोन जणांविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

mnewsmarathi 04 Dec 2022 1 मिनिट वाचन 10,041 वाचन

प्रतिनिधी- फिरोज भालदार

पणदरे ता. बारामती येथील दोघांना दोन जणांकडून जबरी मारहाण दोन जणांवर वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अशोक सुखदेव बळे वय 45 वर्षे रा. पणदरे कुंभार गल्ली ता. बारामती जि. पुणे यांनी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. यावरून गोपी ढोपरे रा. बाबुर्डी ता. बारामती जि. पुणे व याच्याबरोबर आलेला अनोळखी व्यक्ती नाव व पत्ता माहीत नाही. यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत फिर्यादी अशोक सुखदेव बळे व त्यांच्याबरोबर असलेला व्यक्ती ‘साक्षीदार’ 3 डिसेंबर रोजी त्यांच्या टिपर गाडी नंबर एम एच 42. ए क़्यू. 8997 ही गाडी घेऊन लोणी बाजूकडे जात असताना गोपी ढोपरे व अनोळखी व्यक्ती यांनी त्यांची मोटार सायकल ही टिपर ला आडवी लावून फिर्यादी अशोक बळे व त्यांच्याबरोबर असलेल्या व्यक्ती यांना आढवून गोपी ढोपरे याने त्याला कामावरून काढल्याच्या राग मनात धरून गोपी ढोपरे याने अशोक बळे यांना गाडीतून खाली ओढून प्लास्टिकचे केबल पाईपने मारहाण करून अशोक बळे यांचा मोबाईल फोन अपटून नुकसान केले. अशोक बळे यांच्याबरोबर असलेला व्यक्ती ‘साक्षीदार ‘त्यांची भांडणे सोडवण्यास आले असता गोपी ढोपरे यांच्याबरोबर असलेला अनोळखी व्यक्तीने त्यांना देखील प्लास्टिकचे केबल पाईपने मारहाण करून आपखुशीने दुखापत केली व गोपी ढोपरे व अनोळखी व्यक्ती यांनी अशोक बळे यांना तू जर परत इकडे आलास तर जिवंत सोडणार नाही. असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी केली. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनी सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. मनेरी करत आहेत.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi