मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Monday, 5 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

येरवड्यातील बालसुधारगृहात राडा; डोक्यात फरशी घातल्याने अल्पवयीन मुलगा जखमी

mnewsmarathi 04 Jul 2024 1 मिनिट वाचन 9,378 वाचन

प्रतिनिधी

येरवडा येथील पंडीत जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्रात मुलाच्या डोक्यात फरशी मारून त्याला जखमी केल्याप्रकरणी अल्पवयीनाविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

येरवड्यात पं. जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्र संचलित बालसुधारगृह आहे. रविवारी (३० जून) दुपारी एकच्या सुमारास बालसुधारगृहातील मुलांना रांगेत उभे करण्यात आले. त्यावेळी एकाने मुलाच्या डोक्यात फरशी (टाइल) मारुन त्याला जखमी केले. त्यावेळी बालसुधारगृाहतील कर्मचाऱ्यांनी टाइल मारणाऱ्या मुलाला पकडले.

बालसुधारगृहात झालेल्या वादातून मुलाला मारहाण करण्यात आली. मारहाण करणाऱ्या मुलाविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, बालसुधारगृहातील काळजीवाहू (केअरटेकर ) महेश चंद्रकांत जाधव (वय ३७) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार देसाई तपास करत आहेत.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi