मुख्य मजकुरावर जा
Saturday, 19 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 20 July 2024 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

बारामती ! विशाळगड ‘गजापुर’ येथे झालेल्या घटनेच्या निषेर्धात बारामती तहसीलदार कार्यालय येथे मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदन .

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
July 20, 2024 1 मिनिट वाचन 8,525 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधि – फिरोज भालदार

कोल्हापूरमधील विशाळगड गजापुर येथील ‘मुसलमानवाडी’ येथे १४ जुलै रोजी झालेली घटनेच्या निषेर्धात बारामती तहसीलदार कार्यालय येथे तहसीलदार यांना निवेदन देउन बारामतीतील मुस्लिम समाजाकडून निषेध व्यक्त करण्यात आला .

निवेदनामध्ये बारामती मुस्लिम समाज यांच्याकडून विशाळगड येथील गजापुर ‘मुसलमानवाडी’ येथे जमावाने जो हल्ला केला यामध्ये झलेले नुकसान, तेथील स्थाई लोकांच्या त्यांच्या खाजगी जागा, मंदिर, मस्जिद आहेत त्यावर जमावाने हल्ला करणे , खाजगी मालमत्ता उद्धवस्त करणे, धार्मिक स्थळांना, वास्तूंना, मुस्लिम समाजाचा पवित्र ग्रंथ कुराण फाडणे, जाळणे, विटंबना करणे, हे सर्व दंगल घडवून आणण्याच्या उद्देशाने हा प्रकार करण्यात आला आहे . म्हणून या सर्व दंगल खोरांवर प्रशासन, महाराष्ट्र राज्य सरकार यांनी कडक कारवाई करावी अशी मागणी समस्त मुस्लिम समाज बारामतीच्या वतीने निवेदनामध्ये करण्यात आली आहे .

यावेळी पुरोगामी संघटनेतील मानव एकताचे शुभम आहीवळे , मानव अधिकार कार्यकर्ते मुनीर तांबोळी , महाराष्ट्र युवक प्रतिष्ठान बारामती तालुकाध्यक्ष अजिज सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक बारामती तालुका अध्यक्ष मुन्नाभाई बागवान , जमाती येवले माहींचे सोहेल हाफिज, सामाजिक कार्यकर्ते अजीम इनामदार , मोईन शेख , अमिन तांबोळी, तोसिफ बागवान , हनिफ बागवान,जाकीर काजी, ईफ्तकार आतार, आदी उपस्थित होते .

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख