पुणे ग्रामीण हददीमध्ये गावठी पिस्टल ने गोळीबार झालेचे प्रकार घडले असताना मा. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सगो यांनी गावठी पिस्टल बाळगणारेवर व विकी करणारे इसमावर माहीती काढुन कार्यवाही करणेबाबतचे आदेश दिले असताना ता. ३०/०७/२०२४ रोजी १३/०० वा. प्रभारी अधिकारी नितीन नम माळेगाव पोलीस स्टेशन हे पोलीस ठाणे येथे हजर असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मौजे माळेगाव बु।। येथिल इसम नामे राहुल नागराज चतुर्वेदी रा. माळेगाव, ता. बारामती जि.पुणे हा त्याचे जवळ अवैद्य रित्या गावठी पिस्टल व जिवंत काडतुस त्याची विकी करणेकरीता जवळ बाळगत असलेबाबत खात्रिशीर बातमी मिळाली. सदर माहीतीचा आशय पोलीस ठाण्यात हजर असलेले पोलीस उपनिरीक्षक डी. आर. साळवे, व पोलीस स्टाफला कळविला त्याप्रमाणे दोन पंचासमक्ष सदर इसमास सापळा रचुन माळेगाव बुा येशन ताब्यात घेतले असता सदर इसम नामे राहुल नागराज चतुर्वेदी वय २६ वर्षे रा. माळेगाव, ता. बारामती जि. पुणे याची विचारपुस केली असता त्याच्याकडे विकी करण्याचे उद्देशाने बाळगलेले दोन गावठी पिस्टल मिळुन आले त्याबाबत माळेगाव पोलीस स्टेशन येथे त्याचे विरूध्द पो.कॉ. नंदकुमार गव्हाणे यांनी दिलेले फिर्यादी वरून भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३/२५. ५/२५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१), (३), १३५ अन्वये गुन्हा दाखल करून त्यास गुन्हयाचे तपासकामी अटक करण्यात आलेले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोसई तुषार भोर हे करीत आहेत
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामिण श्री. पंकज देशमुख सोो., अपर पोलीस अधिक्षक संजय जाधव सोो., उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड सोो. यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि नितीन नम, पोलीस उपनिरीक्षक, डी. आर. साळवे, तुषार भोर, पोलीस अंमलदार राहुल पांढरे, विजय वाघमोडे, ज्ञानेश्वर मोरे, अमोल राउत, नंदकुमार गव्हाणे, जयसिंग कचरे, अमोल कोकरे, ज्ञानेश्वर सानप, धीरज कांबळे यांनी केलेली आहे.