मुख्य मजकुरावर जा
Saturday, 19 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 12 August 2024 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

मूकबधीर संस्थेच्या नावाने देणगी मागण्याच्या बहाण्याने सराफी पेढीत चोरी, साडेतेरा लाखांचे दागिने चोरून चोरटा पसार

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
August 12, 2024 1 मिनिट वाचन 8,518 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी

मूकबधीर संस्थेच्या नावाने देणगी मागण्याच्या बहाण्याने रविवार पेठेतील सराफी पेढीतून चोरट्याने १३ लाख ६६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सराफी पेढीच्या मालकाने फिर्याद दिली आहे. तक्रारदाराचा दागिन्यांची शुद्धता तपासण्याचा व्यवसाय आहे. पेढीत दागिने घडवून त्याची शुद्धता तपासली जाते. रविवार पेठेतील श्री शितळादेवी मंदिर परिसरात व्यावसायिकाची पेढी आहे. दोन दिवसांपूर्वी सराफी पेढीत दुपारी चोरटा आला. चोरट्याने मूकबधिरांप्रमाणे हावभाव केले. मूकबधीर संस्थेसाठी देणगी द्यावी, असे पत्रक त्याने पेढीच्या मालकाला दिले. त्यांनी चोरट्याला ५० रुपये देणगीपोटी दिले. त्यानंतर चोरट्याने सराफी पेढीच्या मालकाचे लक्ष नसल्याची संधी साधली. सोन्याचे दागिने ठेवलेला डबा चोरून चोरटा पसार झाला. डब्यात १३ लाख ६६ हजार रुपयांचे दागिने होते. पसार झालेल्या चोरट्याचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे तपास करत आहेत.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख