• Home
  • इतर
  • वडगाव निंबाळकर प्रशालेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
Image

वडगाव निंबाळकर प्रशालेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

प्रतिनिधी – फिरोज भालदार

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील स्वातंत्र्य विद्या मंदिर या प्रशालेमध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष पैलवान नानासाहेब मदने यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमासाठी बहुजन हक्क परिषद बारामती तालुका युवक अध्यक्ष अमोल गायकवाड सामाजिक कार्यकर्ते सिताराम खुडे नाभिक समाज संघटनेचे वडगाव निंबाळकरचे सचिव पांडुरंग पवार,युवा नेते वैभव साळवे प्रशालेचे प्राचार्य डी.ए. बनकर व शिक्षक-शिक्षिका आणि विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होत्या. यावेळी बारामती तालुका बहुजन हक्क परिषदेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे अवचित साधून जनता शिक्षण संस्थेचे स्वातंत्र्य विद्या मंदिर या प्रशालेला रोख स्वरूपाची देणगी देण्यात आली.ही देणगी प्राचार्य डी ए बनकर यांनी स्वीकारली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.बी. चौगुले यांनी केले तर आभार बी. जी.शिंदे यांनी मानले.

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025