प्रतिनिधी
दापोडी, पुणे येथील सी. के. गोयल कला वाणिज्य महाविद्यालयात गुरुवार दिनांक दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी८:०० ते११:०० यावेळीत “विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अध्यापन करून शिक्षक दिन अतिशय उत्साहात संपन्न केला.
शिक्षक दिनानिमित्त महाविद्यालयातील सर्व कामकाज विद्यार्थ्यांनी सांभाळले, शिक्षक प्राध्यापक म्हणून प्रत्यक्ष वर्गात शिकवण्याचे काम करण्याचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. अतिशय तयारीने उस्फूर्तपणे विद्यार्थ्यांनी वर्गाध्यपनाचे काम केले.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमधून निवडक विद्यार्थ्यांनी प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी अशा भूमिका बजावल्या आणि अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात शिक्षक दिन साजरा केला.
वर्गाध्यपनानंतर १०:०० वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात’ शिक्षक दिन’समारोपकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील नियमित असणाऱ्या प्राध्यापकांचे गुलाब पुष्प देऊन शिक्षक दिनानिमित्त कृतज्ञता व्यक्त केली.
तसेच महाविद्यालयाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थी शिक्षकांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
दापोडी येथील”प्रबोधिनी प्रतिष्ठान”चे श्री गोरक्ष ब्राह्मणेसर यांच्या वतीने महाविद्यालयातील अध्यापन कार्यात सहभागी विद्यार्थीविद्यार्थी शिक्षक व महाविद्यालयात नियमित अध्यापन करणारे प्राध्यापक यांचा शिक्षक दिनानिमित्त “शिवाजी कोण होता?”-लेखक कै. गोविंद पानसरे यांचे पुस्तक आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून व स्वागत गीताने करण्यात आली.
शिक्षक दिन कार्यक्रमानिमित्त प्रा. ज्योती लेकुळे यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले.
शिक्षक दिन कार्यक्रमानिमित्त आज शिक्षक यांची भूमिका केलेल्या विद्यार्थी शिक्षकांनी आपली मनोगत व्यक्त केली त्यांनी आजच्या दिवशी अध्यापन करताना आलेल्या अनुभव व्यक्त केले. त्याला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सूर्यवंशी यांनी याप्रसंगी अतिशय उत्तम पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांचे कौतुक केले.
आजच्या शिक्षक दिन कार्यक्रमांमध्ये संस्कृती उबाळे यांनी प्राचार्य पदाची जबाबदारी पार पाडली. तर शिवानी घुले यांनी उप-प्राचार्य पदाची जबाबदारी पार पडली.
शिक्षक दिनी आफ्रीन बेग, नंदिनी देशमुख, सुलतान रदाफ, स्वप्नाली काची, प्रज्ञा पंडागळे, नाझमीन शेख, पायल चव्हाण, एकता शिंदे, पायल उपरवट, अनुष्का भिंगारदिवे यांनी शिक्षकांची भूमिका करत अध्यापन केले.
कार्यक्रमाची संयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सांस्कृतिक विभाग यांच्यावतीने करण्यात आले.
कार्यक्रमाच्या आयोजन राष्ट्रीय सेवा योजने विभाग प्रमुख प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे, प्रा .सिद्धार्थ कांबळे, प्रा.ज्योती लेकुळे, प्रा. चंद्रभागा उघडे, प्रा. वैभव भालेराव, डॉ अंकुश काळे, डॉ .उत्तम गोरड यांनी केले असून त्यांना इतर प्राध्यापकांनी सहकार्य केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकता शिंदे यांनी केले प्रास्ताविक प्रज्ञा पंडागळेआभार स्वप्नाली काची यांनी मानले
कार्यक्रमाची सांगता “वंदे मातरम! गीताने झाली.