जेजुरी पोलीस स्टेशन हदीतील निरा येथील गोरगरींबाना लोण करून देतो असे म्हणुन फसविणारी भाउ बहीण टोळीतील भाउ जेरंबद, बहीण फरार

क्राईम

प्रतिनिधी

इसम अस्लम गोडया सयद मुलानी व यास्मीन भालदार व त्याचे इतर साथीदार असे यांनी तक्रारदार रामचंद्र मारूती गायकवाड वय ४२ वर्षे व्यवसाय प्रिटींग प्रेस रा. सोमेश्वरनगर ता. बारामती जि. पुणे यांना तसेच निरा गावातील इसम १) गणेश पडघमकर रा.निरा यास १,००,०००-८० रू २) नितीन निगडे रा. गुळुंगे ता पुरंदर यास ६५०००-०० रु ३) युवराज रामा चव्हाण रा. जेठर यास ६२४००-०० रूपयास ४) दत्तात्रय काशीनाथ माने रा. वाणेवाडी ता. बारामती जि.पुणे यास ३५,०००-०० रू ५) अविनाश बाबासो गायकवाड रा करंजे ता. बारामती जि.पुणे यास १६५००-०० रूपयास असे यांना वेळावेळी अदयापर्यन्त एकुण ४,८१,४००-०० रूपयेची मोबाईलवरून लोन अॅप डाउनलोड करून, त्यावरून लोन करून लोणची वरील रक्कम स्वःतचे खात्यावर घेवुन आमची फसवणुक केली आहे. त्यावरून इसम १) अस्लम गोंडया सयद मुलाणी रा. शिवतकारवाडी निरा, ता पुरंदर जि पुणे २) यास्मीन भालदार रा. शिवतकार वाडी निरा ता. पुरंदर जि. पुणे व त्याचे इतर साथीदाराविरूध्द विरुष्द तकार आहे. वगैरे मजकुरचे तक्रारीवरून जेजुरी पोलीस स्टेशन गु.र.न ३६७ /२०२४ बीएन.एस ३१८(४),३(५) प्रमाणे गुन्हा नोद करणेत आला आहे.

दाखल गुन्हयाचे तपासात आरोपीत १) अस्लम गोडया समद मुलाणी रा शिवतकारवाडी निय, ता. पुरंदर जि.पुणे यास ताब्यात घेवुन त्याचेकडे चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा केलेचे कबुल केले असुन, त्यास मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्याची ४ दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली असुन आरोपीत अस्लम गोंडया सयद मुलाणी याची बहीण फरार आरोपी २) यास्मीन भालदार रा.शिवतकार वाडी निरा ता. पुरंदर जि.पुणे ही अदयाप फरार आहे. तीचा शोधकामी एक टीम रवाना करणेत आली आहे.

सदरची कारवाई श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस अधिक्षक सोो, पुणे ग्रामीण, श्री गणेश बिराजदार, अपर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग बारामती, याचे मार्गदर्शनाखाली श्री दिलीप शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी, भोर विभाग सासवड, श्री तानाजी बरडे उपविभागीय पोलीस अधिकारी, याचे सुचनाप्रमाणे श्री दिपक वाकचौरे, सहायक पोलीस निरीक्षक, जेजुरी पोलीस स्टेशन, श्री सर्जेराव पुजारी पोलीस उपनिरीक्षक, जेजुरी पोलीस स्टेशन यांनी केली असुन गुन्हयाचा तपास श्री सर्जेराव पुजारी पोलीस उपनिरीक्षक, हे करीत आहे.