Image

गाडीचा धक्का लागला म्हणून खून

प्रतिनिधी

रस्त्याने जाताना मोटारगाडीचा दुचाकीला धक्का लागल्याने झालेल्या वादानंतर दोन भावांनी चालकाच्या घरात घुसून त्याचा खून केल्याची घटना गोवंडी परिसरात घडली आहे. याबाबत शिवाजी नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत यामध्ये दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

आदील खान (३५) असे यातील मृत तरुणाचे नाव असून तो गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरातील बैंगणवाडी येथे राहत होता. शनिवारी रात्री दहाच्या सुमारास आदिल त्याची कार घेऊन घरी जात होता. त्यावेळी रस्त्यालगत उभ्या असलेल्या एका दुचाकीला कारचा धक्का लागला. ती दुचाकी एका महिलेच्या अंगावर पडली. त्यात महिलेला किरकोळ दुखापत झाली होती. त्या कारणावरून दोघांमध्ये काही वेळ वाद झाला होता. महिलेने ही बाब तिच्या मुलांना सांगितल्यानंतर त्यांनीही आदिलशी वाद घातला. त्यानंतर रात्री महिलेच्या दोन्ही मुलांनी आदिलच्या घरी जाऊन त्याच्यावर चाकूने हल्ला केला. त्या हल्यात आदिल गंभीर जखमी झाला होता. त्याला तत्काळ गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

शिवाजी नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत, आरोपींचा शोध सुरू केला. मात्र तोपर्यंत दोन्ही आरोपी फरार झाले होते. अखेर रविवारी पहाटे पोलिसांनी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून अब्दुल शेख आणि शरीफ शेख या दोन्ही आरोपींना अटक केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Releated Posts

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026