• Home
  • क्राईम
  • कात्रज घाटात पिस्तुलातून गोळी झाडून एकाचा आत्महत्येचा प्रयत्न
Image

कात्रज घाटात पिस्तुलातून गोळी झाडून एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

प्रतिनिधी

कर्जबाजारी झाल्याने तरुणाने पिस्तुलातून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना कात्रज भागात घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबारात जखमी झालेल्या तरुणावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तरुणावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी दिली. कात्रज घाटात सोमवारी रात्री दहाच्या सुमारास एक तरुण जखमी अवस्थेत पडल्याची माहिती गस्त घालणाऱ्या पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्यांला तातडीने रुग्णालयात दाखल केले. कात्रज घाटात चोरट्यांनी अडविले. पैसे न दिल्याने चोरट्यांनी पिस्तुलातून गोळीबार केल्याची माहिती तरुणाने पोलिसांना दिली.

त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. कात्रज घाटातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले. तरुणाने दिलेली माहिती संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांची चौकशी केली. चौकशीत कर्जबाजारी झाल्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती त्याने दिली. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संबंधित तरुणाने बाळगलेले देशी बनावटीचे पिस्तूल कोठून आणले, यादृष्टीने तपास सुरू आहे, असे पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले.

Releated Posts

एक वर्षापासून फरार असलेल्या मोक्कातील आरोपीला गुन्हे शाखा युनिट ४ ची अटक

प्रतिनिधी पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने एका मोठ्या कारवाईत एक वर्षापासून फरार असलेल्या मोक्का गुन्ह्यातील पाहिजे…

ByBymnewsmarathi Jun 9, 2026

रांजणगाव MIDC मध्ये देहव्यापारावर धाड; सात महिलांची सुटका, दोन अटकेत

प्रतिनिधी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन आणि दहशतवाद विरोधी शाखेने केलेल्या संयुक्त कारवाईत एका लॉजिंगमध्ये चालणाऱ्या देहव्यापाराचा पर्दाफाश केला…

ByBymnewsmarathi Jun 3, 2026

जुन्नर तालुक्यात दुहेरी हत्याकांड, रात्रीत होत्याच नव्हत झालं..

प्रतिनिधी जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे मढ गावच्या हद्दीत बगाडवाडी येथे तळेरान गावच्या शिवेवर राहत असलेल्या मुकने कुटुंबात अत्यंत…

ByBymnewsmarathi Jun 3, 2026

बारामती तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी पोलिसांकडून अवैद्य दारू विक्रेत्यांची धरपकड. हे उशिरा सुचलेले शहाणपण? यामुळे नागरिकांमध्ये वेगळ्याच चर्चा.

संपादक – मधुकर बनसोडे. काही दिवसांपूर्वीच पुणे शहरामधील हडपसर येथे भेसळयुक्त दारू पिल्याने काही नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या…

ByBymnewsmarathi Jun 2, 2026