संपादक मधुकर बनसोडे.
आज सकाळी 11 वाजता शेतकरी कृती समितीचे नेते सतीश राव काकडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने सोमेश्वर कारखान्याच्या कार्यकारी संचालक यांना निवेदनाद्वारे पहिला हप्ता 3300 मिळावा. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ठराव झाल्याप्रमाणे गेट केन ऊस गळितासाठी आणणे त्वरित थांबवावे अशा आशियाचे निवेदन देण्यात आले होते.
त्या निवेदनाची दखल घेत सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक यादव साहेब यांनी संचालक मंडळाची मीटिंग शनिवार दिनांक 4/1/2025 रोजी राजमाता जिजाऊ सभागृह येथे होणार असल्याचे मीटिंग नोटीस काढले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान देखील व्यक्त केले
जर या मीटिंगमध्ये सकारात्मक चर्चा झाल्या नाहीत तर शेतकरी कृती समितीच्या वतीने काटा बंद आंदोलन करणार असल्याचे देखील या अगोदरच शेतकरी संघटनेचे नेते सतीश राव काकडे यांनी सांगितले आहे.