• Home
  • क्राईम
  • वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याच्या बंगल्यात चंदन चोरी, तीन झाडे कापून नेल्याचे उघड
Image

वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याच्या बंगल्यात चंदन चोरी, तीन झाडे कापून नेल्याचे उघड

प्रतिनिधी

वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याच्या बंगल्यातून चंदनाची तीन झाडे कापून नेल्याची घटना उघडकीस आली. पसार झालेल्या चंदन चोरट्यांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

याप्रकरणी चंदन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पांडीयराज मुरुगन (वय ३०) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लष्कर भागातील पूना क्लबजवळ डॉ. राजेंद्रसिंग मार्गावर वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचे बंगले आहेत. बंगले प्रशस्त आहेत. नाताळानिमित्त लष्करी अधिकारी बाहेरगावी गेले आहेत. दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री चोरटे बंगल्याच्या आवारात शिरले. चोरट्यांनी चंदनाची तीन झाडे कापून नेली. चंदनाची झाडे चोरीला गेल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक डॉ. आरिफा मुजावर यांनी दिली.

पोलिसांनी लष्करी अधिकाऱ्यांच्या बंगल्यास भेट दिली. बंगल्याचे आवार प्रशस्त आहेत. बंगल्यात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. त्यामुळे चोरट्यांचे चित्रीकरण उपलब्ध झाले नाही. पसार झालेल्या चोरट्यांचा पोलिसांकडून माग काढण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक मुजावर तपास करत आहेत.

Releated Posts

दोन गावठी पिस्तूल, एक रायफलसह आरोपी जेरबंद; माळेगाव पोलिसांची धडक कारवाई

प्रतिनिधी माळेगाव पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रांविरोधात कारवाई करत दोन गावठी पिस्तूल, एक रायफल, दोन जिवंत काडतुसे तसेच दोन काडतुसांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

रागाच्या भरात नातवाने आजोबांचा लोखंडी गजाने केला खून; आरोपी नातू पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी   शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे शेतातील व घरातील कामे सांगितल्याच्या रागातून २६ वर्षीय नातवाने ८४ वर्षीय…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

बारामतीत म्हशींच्या 12 रेडकांची क्रूर वाहतूक उघड; पिकअपसह चालकावर गुन्हा दाखल

सहसंपादक- अक्षय थोरात बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी परिसरात म्हशींच्या रेडकांची कथितपणे क्रूर व बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी एका…

ByBymnewsmarathi Jun 14, 2026

ऑनलाईन गेमिंगच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; पुणे पोलिसांनी मोठ्या सायबर रॅकेटचा पर्दाफाश

प्रतिनिधी ऑनलाईन गेम खेळून अल्पावधीत मोठी कमाई करून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या मोठ्या सायबर…

ByBymnewsmarathi Jun 13, 2026