• Home
  • माझा जिल्हा
  • शब्दगंध” साहित्यिक परिषद बारामती तालुका अध्यक्ष पदी प्रा. हनुमंत विठ्ठलराव माने यांची बिनविरोध निवड
Image

शब्दगंध” साहित्यिक परिषद बारामती तालुका अध्यक्ष पदी प्रा. हनुमंत विठ्ठलराव माने यांची बिनविरोध निवड

प्रतिनिधी.

“शब्दगंध” साहित्यिक परिषद अहिल्यानगर, महाराष्ट्र राज्य या साहित्यिक परिषदेची बैठक राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली कोहिनूर मंगल कार्यालय अहिल्यानगर या ठिकाणी संपन्न झाली.
साहित्यप्रेमी मंडळ सोमेश्वरनगर या साहित्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष- प्रा.हनुमंत विठ्ठलराव माने यांची “शब्दगंध” साहित्यिक परिषदेच्या बारामती तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
तसेच कोल्हापूर जिल्हा समन्वयकपदी- डॉ. सुनीलकुमार सरनाईक व
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई व “शब्दगंध” साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य आयोजित सोळाव्या राज्यस्तरीय “शब्दगंध” साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका संजीवनी तडेगावकर यांची निवड करण्यात आली आहे.
अशी माहिती “शब्दगंध” साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी दिली. या निवडीबद्दल
शब्दगंध चे अध्यक्ष- राजेंद्र उदागे, कार्याध्यक्ष- ज्ञानदेव पांडुळे, कार्यवाह- भारत गाडेकर, राज्य संघटक- प्रा. डॉ.अशोक कानडे,उपाध्यक्ष- प्राचार्य डॉ. जी.पी. ढाकणे, संस्थापक सचिव-सुनील गोसावी, खजिनदार- भगवान राऊत, संयोजन समिती प्रमुख बबनराव गिरी यांनी अभिनंदन केले.

Releated Posts

सोमेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत

मोरगाव – प्रतिनिधी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात पाचवीच्या वर्गात दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ; जलसंधारण व शेती विकासाला नवी गती

सहसंपादक – अक्षय थोरात खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री…

ByBymnewsmarathi Jun 10, 2026

हरित भविष्यासाठी संत निरंकारी मिशनचे प्रेरणादायी पाऊल

प्रतिनिधी ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त खंडाळा, लोणावळासह देशभरातील १८ ठिकाणी वृक्षारोपण व स्वच्छता अभियान          …

ByBymnewsmarathi Jun 5, 2026