• Home
  • क्राईम
  • चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून, नऱ्हे भागातील घटना
Image

चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून, नऱ्हे भागातील घटना

प्रतिनिधी

चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे भागात घडली. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी पतीला अटक केली.

रेश्मा भिकू खुडे (वय ३२, सध्या रा. कुटे मळा, मानाजीनगर, नऱ्हे, मूळ रा. वडूज, जि. सातारा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी कुमार कलगोंडा पाटील (वय ४२, मूळ रा. इचलकरंजी, कोल्हापूर) याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेश्मा यांचा पहिला विवाह झाला होता. पतीसोबत पटत नसल्याने त्यांनी आरोपी कुमारशी दुसरा विवाह केला. पहिल्या पतीपासून त्यांना दोन मुले होते. महिनाभरापूर्वी त्या कुमार याच्यासोबत नऱ्हे भागात राहायला आल्या होत्या. कुमार रेश्मा यांच्या चारित्र्याचा संशय घेत होता. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाले होते.

शुक्रवारी सायंकाळी कुमार कामावरुन घरी आला. त्याने पुन्हा रेश्मा यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वादातून त्याने रेश्मा यांचा ओढणीाने गळा आवळून खून केला. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी पती कुमारला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सागर पवार तपास करत आहेत.

Releated Posts

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी: RDX च्या उल्लेखामुळे शहर हादरले

प्रतिनिधी ​कोल्हापूर शहराचे प्रशासकीय केंद्र असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाला आज (शुक्रवार) दुपारच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने थेट ई-मेलद्वारे बॉम्बने…

ByBymnewsmarathi Dec 12, 2025

पोलिस निरीक्षक यांच्या त्रासाला कंटाळून सहकर्मचाऱ्यांची आत्महत्या करत असल्याबाबतची पेपर नोट सोशल मीडियामध्ये वायरल !!!!!

प्रतिनिधी   वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावर गंभीर मानसिक छळाचे आरोप; व्हॉट्सॲप स्टेटसमुळे घटनेची माहिती उघड. ​पुणे…

ByBymnewsmarathi Dec 6, 2025

गोठ्यात अवैध गर्भलिंग-निदान केंद्र, दोन जण अटकेत

प्रतिनिधी   जालना जिल्ह्यातील नांजा वाडी येथे एका पत्र्याच्या गोठ्यात अवैध गर्भलिंग-निदान केंद्र चालवले जात असल्याचा पर्दाफाश झाला…

ByBymnewsmarathi Nov 28, 2025

लाल किल्ल्याजवळ भीषण कार स्फोट — आठ ठार, अनेक जखमी; एनआयएचा तपास सुरू

प्रतिनिधी राजधानी दिल्ली 10 नोव्हेंबर सोमवारी सायंकाळी हादरली, जेव्हा लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळील रिंग रोडवर सुमारे 6:48 वाजता…

ByBymnewsmarathi Nov 10, 2025