• Home
  • क्राईम
  • दारुच्या नशेत पोलीस नियंत्रण कक्षाला खोटी माहिती, वारजे पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा
Image

दारुच्या नशेत पोलीस नियंत्रण कक्षाला खोटी माहिती, वारजे पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा

प्रतिनिधी

दारुच्या नशेत पोलीस नियंत्रण कक्षाला खोटी माहिती देऊन दिशाभूल करणाऱ्या एकाविरुद्ध वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वारजे भागातील रामनगर परिसरात रविवारी ही घटना घडली.

याप्रकरणी निवास नारायण अकोले (वय ४२, रा. रामनगर, वारजे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई अमोल सूतकर यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे भागातील रामनगर परिसरात एका महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची खोटी माहिती अकोले याने पोलीस नियंत्रण कक्षाला (११८) दिली. या घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला रविवारी (९ मार्च) दुपारी अडीचच्या सुमारास मिळाली. त्यानंतर वारजे पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश बडाख, उपनिरीक्षक आर. आर. भरसट यांनी घटनास्थळी धाव घेतली. गस्त घालणाऱ्या पोलिसांचे पथक त्वरीत तेथे पोहोचले. पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा रामनगर भागात महिलेवर अत्याचार झाल्याची घटना घडली नसल्यचे उघडकीस आली. पोलीस नियंत्रण कक्षाला अकोले याने खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्याचे चैाकशीत उघड झाले.

दिशाभूल करणारी माहिती देणे, तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक भरसट तपास करत आहेत.

Releated Posts

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026