• Home
  • क्राईम
  • बारामती ! वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मध्ये पोस्को अंतर्गत एकावर गुन्हा दाखल. 
Image

बारामती ! वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मध्ये पोस्को अंतर्गत एकावर गुन्हा दाखल. 

प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे दूरशेत्र मध्ये विश्वराज प्रताप गायकवाड रा .करंजे ता.बारामती जिल. पुणे याच्याविरुद्ध पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…

फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि. १० मार्च २०२२ ते दि. ३० मार्च २०२५ या काळामध्ये फिर्यादी हे करंजे ता. बारामती गावच्या हद्दीतील सोमेश्वर विद्यालयात सन २०२२ मध्ये इयत्ता १०वी मध्ये शिक्षण घेत असताना शाळेत येत जात असताना आरोपी विश्वराज प्रताप गायकवाड रा. करंजे ता. बारामती जि. पुणे याने जबरदस्तीने फिर्यादी हिच्याशी मैत्री करून तिच्याशी जबरदस्तीने बोलत असे व फिर्यादी करंजे पूल येथे  एका खाजगी क्लासला  येत असताना १० मार्च २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास आरोपी विश्वराज गायकवाड याने मला तू खूप आवडते माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे असे म्हणून प्रपोज केला .

यावेळी फिर्यादी हिने त्यास नाकार केला असता आरोपी याने आपली मैत्री आहे तुझे बाबा काही एक विचार करणार नाहीत असे सांगितले. त्यानंतर १२ मार्च २०२२ ते २५ मार्च २०२२ दरम्यान फिर्यादी हिला कन्हैया स्वीट होम करंजे पुल येथे आरोपी गायकवाड याने स्कुटी मोटरसायकल वर येऊन जबरदस्तीने फिर्यादी हिला कॉफी प्यायला चल म्हणून स्कुटीवर बसवले व निरा लोणंद रोड लगत असलेल्या एका लॉज वरील रूमवर नेऊन तिच्या इच्छाविरुद्ध दोन वेळा शरीर संबंध केले व त्यानंतर सदर प्रकार कोणाला सांगू नको अशी धमकी देऊन आरोपी याने फिर्यादी हिला करंजे पूल येथे सोडले. त्यानंतर फिर्यादी एम एस के कॉलेजमध्ये इयत्ता ११ वी मध्ये शिक्षण घेत असताना कॉलेजच्या गॅदरिंग डे च्या वेळी आरोपी याने फिर्यादी हिच्या हाताला जबरदस्तीने ओढून फिर्यादी सोबत मोबाईल मध्ये एकत्र फोटो काढले .

आरोपी हा फिर्यादी हिला कॉलेजमध्ये सतत तिच्यापाठीमागे फिरून त्रास देत होता. त्यानंतर फिर्यादी ही २०२४ व २५ मध्ये नेट परीक्षेची तयारी साठी लातूर येथे गेली असताना आरोपी हा फिर्यादी हिला वेळोवेळी फोन करून तु मला भेट असे म्हणून शरीर सुखाची मागणी करत त्या ठिकाणी फिर्यादी हिने त्याला नकार दिला असता आरोपी याने फिर्यादी हिला तुझे माझ्याकडे न्यूड फोटो आहेत ते व्हायरल करण्याची धमकी दिली. व आरोपी याने त्याची बहीण तिच्या मोबाईल वरून फिर्यादी याचे आई यांच्या मोबाईलवर फिर्यादी व आरोपी दोघांची काढलेले सेल्फी फोटो पाठवले . सदर प्रकार फिर्यादी यांनी घरच्यांना समजावून सांगितला असून यावरून फिर्यादी हिने विश्वराज प्रताप गायकवाड याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कायदा 1860 चे कलम 354(अ),354(ड),354,376,2(एन ),506,सह पोस्को 4,8,12 गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास पो. स. ई.साबळे करीत आहेत .

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अल्पवयीन मुली, महिला यांच्यावर  अत्याचार खपवून घेणार नाही अत्याचार करणा-या नराधमांना चांगला धडा शिकवला जाईल, मुलींनी असा अन्याय सहन न करता पोलीसांत तक्रार द्यावी. पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे

Releated Posts

कोंढव्यात पती-पत्नीचा राहत्या घरी मृत्यू; कारण अद्याप अस्पष्ट

प्रतिनिधी पुण्यातील कोंढवा येथील श्रद्धानगर परिसरात एका ५२ वर्षीय व्यक्ती आणि त्याच्या ४८ वर्षीय पत्नीचा त्यांच्या राहत्या घरी…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

पेट्रोलिंगमध्येच उघडकीस आली मोटारसायकल चोरीची टोळी, सराईत चोर पोलिसांच्या ताब्यात वडगाव निंबाळकर पोलिसांची कारवाई

 प्रतिनिधी. वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत निंबूत बारामती रोडवर निंबूत गावचे हद्दीत निंबुत छप्री कॅनॉल येथे पेट्रोलिंग दरम्यान…

ByBymnewsmarathi Jan 7, 2026

वडगाव निंबाळकर पोलीसानी शेतकऱ्यांच्या शेळ्या व बोकड चोरणाऱ्या तिन आरोपींच्या आवळल्या मुसक्या

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत मौजे सदोबाचीवाडी गावाचा हद्दीतील इनामवस्ती होळ रोड येथील तक्रारदार नामे संजय जगन्नाथ…

ByBymnewsmarathi Jan 5, 2026

श्रीरामपूरमध्ये भरदिवसा गोळीबार; बंटी जहागीरदार यांचा मृत्यू

प्रतिनिधी श्रीरामपूर शहरात बुधवारी दुपारी भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. बंटी (असलम शब्बीर) जहागीरदार यांच्यावर…

ByBymnewsmarathi Jan 1, 2026