• Home
  • क्राईम
  • व्यसनमुक्ती केंद्राची फी न दिल्याने तरुणाला बेदम मारहाण; नांदेड सिटी पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा
Image

व्यसनमुक्ती केंद्राची फी न दिल्याने तरुणाला बेदम मारहाण; नांदेड सिटी पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा

प्रतिनिधी

व्यसनमुक्ती केंद्रात भावाला दाखल केल्यानंतर मित्रांकडून फीसाठी घेण्यात आलेले पैसे परत न केल्याने तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी सिद्धार्थ पवार (रा. गारमाळ, रायकरनगर, धायरी), कार्तिक उर्फ पप्पू बाळकृष्ण लोणारे (रा. लोणारे वस्ती, धायरी), बबलू कसाळे (रा. धायरी) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूरज अरुण गायकवाड (वय ३०, रा. लोणारे वस्ती, धायरी) याने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज गायकवाड याचा भाऊ आकाश याला दारू पिण्याचे व्यसन आहे. त्याला सिद्धार्थ पवार याचे सिंहगड रस्त्यावरील खानापूर परिसरात व्यसनमुक्ती केंद्र आहे. व्यसनमुक्ती केंद्रात आकाश याला १५ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. दहा दिवसांसाठी चार हजार रुपये आणि ने-आण करण्यासाठी एक हजार रुपये असे पाच हजार रुपये सिद्धार्थ पवार याला द्यायचे ठरले होते.

३१ मार्च रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास सूरज गायकवाड धायरीतील उंबऱ्या गणपती चौकातून निघाला होता. त्या वेळी तेथील एका दुकानासमोर सिद्धार्थ पवार, कार्तिक लोणारे, बबलू कसाळे थांबले होते.

त्या वेळी त्यांनी सूरज याच्याकडे व्यसनमुक्ती केंद्राची फी मागितली. तेव्हा त्याने माझ्याकडे पैसे नसल्याचे त्यांना सांगितले. त्या वेळी तिघांनी त्याला रस्त्यात मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपी लोणारे याने त्याला कोयत्याचा धाक दाखवून धमकावले. ‘मी या भागातील दादा आहे. माझ्या नादी लागायचे नाही.

व्यसनमुक्ती केंद्रातील फी आता दिली नाही, तर जिवे मारत”, अशी धमकी देण्यात आली. मारहाणीचा प्रकार सुरू असताना नागरिक जमले. तेव्हा तिघांनी दहशत माजविली. सूरज आरोपींच्या तावडीतून पळाला. लोणारे हा सराइत आहे. त्याच्या दहशतीमुळे सूरजने तक्रार दिली नव्हती. आरोपी पुन्हा मारहाण करतील, अशी भीती वाटल्याने सूरजने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बुनगे तपास करत आहेत

Releated Posts

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026