प्रतिनिधी
निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयात निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठान संस्थेच्या निंबूत व पिंपरे खुर्द या दोन्ही विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शनिवार दि.२६ एप्रिल २०२५ रोजी सायं.६.०० वा.संपन्न झाला. विद्यालयास पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याने रौप्यमहोत्सवी उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.सतीशभैय्या काकडे देशमुख,उपाध्यक्षाआणि निमंत्रक सौ.सुप्रियाताई अश्विनकुमार पाटील तसेच उपाध्यक्ष मा.श्री.भीमराव बनसोडे सर संस्थेच्या,संचालिका सौ. सविताताई सतीशराव काकडे देशमुख, ज्येष्ठ संचालक मा.श्री.मुकुंदराव काकडे देशमुख,संस्थेचे मानद सचिव मा. श्री. मदनराव काकडे देशमुख,संस्थेच्या संचालिका सौ.गायत्रीताई मयुरेश राजेभोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्यालयाच्या वतीने आलेल्या मान्यवरांचे स्वागत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली ननावरे यांनी केले आणि आपल्या प्रास्ताविकामध्ये विद्यालयाने पंचवीस वर्षांमध्ये केलेल्या प्रगतीचा आढावा मांडला व विद्यालयाने या पंचवीस वर्षांमध्ये राबविलेल्या विविध उपक्रमांविषयी माहिती सांगितली.
व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन आणि श्री.बाबालाल काकडे देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी विद्यालयातील बहुसंख्य माजी विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थी विद्यालय स्थापन झाल्यानंतर जी प्रार्थना म्हणत होते त्या ‘सत्यम शिवम सुंदरा’ या प्रार्थनेने झाली.आणि सर्वच विद्यार्थी आपल्या शालेय परिपाठात रममान झाले.
यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामध्ये शाळेतील काही आठवणी,काही गमती- जमती यांना उजाळा दिला तसेच संस्था व शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली.यामध्ये डॉक्टर अश्विनी गार्डी, दिपाली काकडे, शुभम काकडे,संपदा सोनवणे,ऋषिकेश जगताप,सतीश कांबळे, संतोष काळे, पिंपरे विद्यालयातील माजी विद्यार्थी शशांक पवार, मानसी कुसेकर आणि थोपटे या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
तसेच या कार्यक्रमास ज्या विद्यार्थ्यांना उपस्थित राहता आले नाही अशा विद्यार्थ्यांनी बाईट पाठवून या कार्यक्रमासाठीची उपस्थिती दर्शविली. यामध्ये ताई भाऊ काळे,प्रियंका हुलगे साक्षी खुडे,पूजा जगताप यांनी बाईटच्या माध्यमातून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
यावेळी पिंपरे विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.नेवसे सर यांनी आपल्या मनोगत मध्ये पिंपरे विद्यालयाच्या २५ वर्षाच्या वाटचालीविषयी माहिती दिली.संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.भीमराव बनसोडे सर यांनी विद्यालयाने पंचवीस वर्षांमध्ये केलेल्या शैक्षणिक प्रगती विषयी समाधान व्यक्त केले व सर्व माजी विद्यार्थ्यांचे कौतुकही केले.
यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा आणि माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याच्या निमंत्रिका सौ. सुप्रियाताई अश्विनकुमार पाटील यांनी माजी विद्यार्थीमेळाव्याच्या आयोजना पाठीमागची भूमिका व्यक्त करून,मेळाव्यास बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित राहिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.संस्थेचे अध्यक्ष मा.श्री
सतीशभैय्या काकडे देशमुख यांनी माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ज्या उद्देशाने विद्यालय स्थापन केले तो उद्देश यशस्वी झाल्यासारखे वाटते आहे, विद्यालयातील अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, वकील, लष्करी सेवेमध्ये तसेच इतर मोठ्या पदावरती आहेत याबद्दल त्यांनी कौतुक केले, भविष्यातही अशाच प्रकारे विद्यार्थी मोठ्या पदावर जाऊन आपल्या विद्यालयाचे नाव करतील अशी आशा व्यक्त केली.
यावेळी पिंपरे विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री.झगडे मधुकर अनिल आणि श्री.बुणगे दत्तात्रय विठोबा यांची सेवापुर्ती होत असल्याने या दोन्ही शिक्षकांचा संस्था व विद्यालयांच्या वतीने सपत्नीक पूर्ण पोशाख देऊन यथोचित सत्कार करण्यात आला व भावी आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
जुबिलन्ट भारतीया फाउंडेशन यांच्या माध्यमातून मा.श्री.अजयजी ढगे साहेब आणि सायली फुंडे यांच्या प्रयत्नातून दीडशे रोपांची उपलब्धता या कार्यक्रमासाठी करून देण्यात आली होती.
काही माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या भौतिक सुविधांमध्ये भर घातली याचा उपयोग विद्यालयात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्की होईल त्याबद्दल विद्यार्थ्यांचे आभार मानण्यात आले.
सर्व माजी विद्यार्थी व उपस्थितांना माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याच्या निमंत्रिका सौ. सुप्रियाताई अश्विनकुमार पाटील यांच्या वतीने स्नेहभोजन देण्यात आले. प्रत्येक माजी विद्यार्थ्यांस रोप भेट देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. भगत सर यांनी केले व आभार श्री.पवार सर यांनी मानले.