प्रतिनिधी – फिरोज भालदार
श्री सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्र जैन धर्मियांची काशी आहे . या पवित्र अश्या जगेला झारखंड राज्य सरकारने व केंद्र सरकार यांनी पर्यटन क्षेत्र म्हणून जाहीर केल्याबाबत वडगाव निंबाळकर गावातील जैन धर्मियांनी केंद्र सरकारने हे चुकीचे निर्णय घेतले आहेत. ह्या अनुषंगाने वडगाव निंबाळकर येथे जप तक सुरज चांद रहेगा सम्मेद शिखरजी का नाम रहंगा , नही देंगे नही देंगे सम्मेद शिखरजी नही देंगे, ना केंद्र की ना राज्य की नही सुनेगी गैरो की , ह्या घोषना देत निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये वडगाव निंबाळकर व्यापारी बांधवांनी बाजारपेठ ही बंद ठेवण्यात आली होती. हा मोर्चा वडगाव निंबाळकर जैन मंदिर ते ग्रामपंचायत कार्यालय समोर पर्यंत काढण्यात आला. यामध्ये वडगाव निंबाळकर तलाठी कार्यालय येथे तलाठी सौ. फुंदे यांना निवेदन पत्र देऊन हे पत्रामार्फत आपण केंद्र सरकारपर्यंत आमच्या भावना पोहोचवाव्या असे जैन धर्मिया ग्रामस्थांनी तलाठी सौ. फुंदे यांना संबोधले . जैन धर्मिय ग्रामस्थांनी श्री. सम्मेद शिखरजी बद्दल आपले मनोगत मांडले व भारत सरकारने व झारखंड राज्य सरकारने त्यांचा निर्णय मागे घ्यावा असे संबोधण्यात आले.ह्यावेळी श्री पार्श्वनाथ स्वामी दिगंबर जैन मंदिर वडगाव निंबाळकर ट्रस्टचे सर्व ट्रस्टी व ग्रामस्थ उपस्थित होते.