• Home
  • क्राईम
  • बनावट जाहिरात दाखवून सुशिक्षित बेरोजगारांकडून लाखो रुपये वसूल
Image

बनावट जाहिरात दाखवून सुशिक्षित बेरोजगारांकडून लाखो रुपये वसूल

प्रतिनिधी

बनावट जाहिरात तयार करून सुशिक्षित बेरोजगारांना शासकीय नोकरी लावुन देण्याचे आमिष दाखवून युवकांना लाखोने गंडविणा-या दोन महाभागापैकी एक राजु पुद्दटवार याने पोलीसांसमोर शरणागती स्विकारल्याने अनेक प्रकरणांचा उलगडा होणार आहे. दरम्यान दोन्ही आरोपींनी मिळून तालुका क्रीडा अधिकारी यांना त्यांच्या मुलाला नोकरी लावून देतो असे सांगत २८ लाख २६ हजार रुपयांनी फसविल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी तालुका क्रीडा अधिकारी यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर पहील्या आरोपीच्या अटकेनंतर दुसरा आरोपी नाना आक्केवार लवकरच पोलीसांच्या गळाला लागेल. असा विश्वास व्यक्त केल्या जात आहे.

मूल येथील नगर परीषदेत लिपीक पदावर सेवारत असलेले राजु उर्फ राजेश पुद्दटवार आणि तालुका क्रिडा कार्यालयात रोजंदारीवर काम करणारा प्रशांत उर्फ नाना आक्केवार यांनी संगनमताने दोन युवकांना शासकीय सेवेत नोकरी लावुन देतो, असे आमीष दाखवुन १६ लाख ५० हजाराने गंडा घातला. दरम्यान राजु पुद्दटवार आणि नाना आक्केवार यांनी आपली फसवणुक केली असे जेव्हा लक्षात आले तेव्हा दोन्ही युवकांनी पोलीस स्टेशन मूल येथे तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार राजेश उर्फ राजु पुद्दटवार आणि प्रशांत उर्फ नाना आक्केवार यांचे विरूध्द पोलीस स्टेशन मूल येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाल्याचे लक्षात येताच अटकेच्या भितीने राजु पुद्दटवार आणि नाना आक्केवार हे शहरातुन बेपत्ता झाले. पोलीस प्रशासन बेपत्ता दोन्ही महाभागांच्या शोधात असताना राजेश उर्फ राजु पुद्दटवार यांनी पोलीस स्टेशन मूल येथे स्वतः हजर राहुन अटक करून घेतली. दुसरा आरोपी नाना उर्फ प्रशांत आक्केवार अजुनही बेपत्ता असुन पोलीसांचे वेगवेगळे पथक त्याचा शोध घेत आहेत. त्यामूळे नाना आक्केवार लवकरच पोलीसांच्या गळाला लागेल. असा विश्वास व्यक्त केल्या जात आहे.

Releated Posts

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026