२४ तासांत प्रेमभंगातून प्रेयसीवर गोळीबार करणारा आरोपी जेरबंद

क्राईम

प्रतिनिधी

बाणेर येथे प्रेयसीवर गोळीबार करून पसार झालेला आरोपी गौरव नायडू (२५, रा. पुनावळे) याला गुन्हे शाखेच्या युनिट-४ च्या पथकाने केवळ २४ तासांत अटक केली.

दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास विरभद्रनगर, बाणेर येथील अश्वमितः हाऊसजवळ फिर्यादी महिलेजवळ अज्ञात इसमाने येऊन गोळीबार केला. या प्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-४ चे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांनी पथक तयार करून आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान, खबऱ्याकडून माहिती मिळाली की आरोपी गौरव नायडू खडकी रेल्वे स्थानकावर दिसणार आहे.

युनिट-४ च्या पथकाने खडकी येथे सापळा लावला. थोड्याच वेळात संशयित व्हेस्पा गाडीसह दिसला. पोलिसांनी घेराव घालून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून पिस्टल, तीन जिवंत काडतुसे व गुन्ह्यात वापरलेली गाडी जप्त करण्यात आली असून मुद्देमालाची किंमत १ लाख ३३ हजार रुपये आहे.

आरोपीला पुढील कारवाईसाठी बाणेर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख, पोलीस उपआयुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक तसेच पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक अमर कदम, पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूम, तसेच पोलीस अंमलदार हरीष मोरे, किशोर दुशिंग, सुभाष आव्हाड, जहांगिर पठाण, विठ्ठल वाव्हळ, अजय गायकवाड, प्रविण भालचिन, तुषार खराडे, विनोद महाजन, अमजद शेख, नागेशसिंग कुंवर, शरद झांजरे, मयुरी नलावडे व रोहीणी पांढरकर यांनी सहभाग घेतला.