प्रतिनिधी.
वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन अंतर्गत सोमेश्वर चौकी येथे मुलगा तुषार विकास गायकवाड रा. चोपडच ता.बारामती जिल्हा पुणे हा त्यांचे ताब्यातील यामाहा मोटारसायकल रेस वाढवून चालवत असताना सोमेश्वर चौकीतील पोलीसांना मिळुन आला करंजे पुल पोलीसांनी सदर यामाहा मोटारसायकल ची पाहणी केली असता त्यास पुढील बाजूस समोरून येणाऱ्या लोकांच्या डोळ्याला त्रास होईल अशा चायनीज एल ई डी लाईट बसवल्याचे आढळून आले सदर एल ई डी लाईटचा वापर करण्यास बंदी असुन तो लाईट लावल्यानंतर समोरून येणाऱ्या वाहण चालकांना रस्ता दिसत नाही व त्यामुळे अपघाताची शक्यता असते पोलीसांनी तुषार गायकवाड यांच्या मोटारसायकलवर कायदेशीर कारवाई केली असुन त्यांची मोटारसायकल पोलिसांनी जप्त केले असून सदर मोटारसायकल मालकास आर टि ओ विभागाने पोलीसांच्या रिपोर्ट वरुन २४०००/- रु दंड केला असुन मोटारसायकल मालकास सदर दंड भरुन मोटारसायकल घेऊन जाण्याचे आदेश दिले आहेत तसेच या पुढे अशा नियम धाब्यावर मोटारसायकल चालवल्यास अशाच प्रकारे दंडात्मक कारवाई केल्या जातील. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे यांनी दिली.
सोमेश्वर नगर हे शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखली जाते त्यामुळे या परिसरामध्ये मोटरसायकल चालकांवरती पोलिसांचे लक्ष असल्याचे नागरिकांमधून बोलली जाते.
या कारवाईमुळे आरटीओ नियमाच्या विरोधात जे बाईक स्वार गाडी चालवत आहेत त्यांना एक प्रकारे चांगलीच जरब बसेल. असा पोलिसांप्रती विश्वास नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.एकंदरीत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन करंजेपुल पोलीस दूर क्षेत्र यांचे प्रमाणिक कामाचे लोकांमध्ये कौतुक होत आहे
पोलीस आपली कर्तव्य प्रामाणिकपणे व चांगल्या प्रकारे करत आहेत अशी परिसरामध्ये चर्चा असून, गोरगरीब लोकांना पोलिसांच्या कडून न्याय मिळत आहे, तक्रारदार थेट पोलिसांशी संपर्क साधत असुन पोलीस मध्यस्थी यांना चौकीत येऊ देत नाहीत, सामान्य नागरिकाला देखील पोलीस आपलेच बांधव आहेत आपल्याला खरंच न्याय मिळू शकतो अशी भावना व्यक्त करीत आहेत करंजे पुल पोलीस दुर क्षेत्र तसेच वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथील गुन्हेगार यांना कायद्याचा जरप बसला असून त्यांनी गुन्ह्यापासून दूर राहण्याचे ठरवले आहे. पोलिसांचा गुन्हे आणि गुन्हेगार यांच्यावर वचक दिसून येते असल्याचे सामान्य नागरिकांमधून बोलले जात आहे.
यामुळेच अनेक तक्रारदार निर्भहीपणे तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला जात असल्याचे चित्र परिसरामध्ये दिसत आहे.
अनेक स्वयंघोषित राजकीय पुढार्यांची दुकाने बंद झाल्यामुळे त्यांना मात्र प्रामाणिक अधिकारी चुकीचे वाटत आहेत.?