• Home
  • क्राईम
  • “जनतेच्या सुरक्षिततेला धोका: हायवेवर वर्दीशिवाय ट्रॅफिक हवालदार भ्रष्टाचार करतोय का?”
Image

“जनतेच्या सुरक्षिततेला धोका: हायवेवर वर्दीशिवाय ट्रॅफिक हवालदार भ्रष्टाचार करतोय का?”

संपादक मधुकर बनसोडे.

फलटण तालुक्यातील हायवेवर रात्री वाहनचालकांना मोठा त्रास होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही ट्रॅफिक हवालदार नाका बंदी नसतानाही वर्दीशिवाय गाड्या अडवत असून, नागरिकांकडून थेट पैशांची वसुली करत असल्याचे आरोप झाले आहेत.

भारतीय मोटार वाहन कायदा, 1988 स्पष्ट सांगतो –

• कलम 130(1) नुसार चालकाने परवाना फक्त “uniformed police officer” कडेच दाखवण्याची सक्ती आहे.

• कलम 132(1) नुसार वाहन थांबवणे फक्त “any police officer in uniform” कडूनच बंधनकारक आहे.

यावरून हे स्पष्ट होते की, वर्दीशिवाय गाड्या अडवणारा व पैशांची मागणी करणारा ट्रॅफिक हवालदार स्वतःच दोषी ठरतो. हे कृत्य सरळसरळ कायद्याचा भंग व भ्रष्टाचाराचे उदाहरण आहे.

दरम्यान, सूत्रांच्या माध्यमातून संबंधित ट्रॅफिक पोलिसांचे काही व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि कॉल रेकॉर्डिंग प्राप्त झालेले आहेत. यामध्ये नेमके काय संभाषण झाले आहे हे लवकरच पुराव्यासहित सर्व नागरिकांसमोर सादर केले जाणार आहे. मात्र त्याआधी, वरिष्ठ पोलीस प्रशासन अशा भ्रष्ट अधिकाऱ्यावर काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यानंतरच हे पुरावे सार्वजनिकरित्या जनतेसमोर मांडले जातील.

रात्री हायवेवर वर्दीशिवाय ट्रॅफिक हवालदाराने गाड्या अडवून पैशांची वसुली करणे हा प्रकार कायद्याचा भंग, भ्रष्टाचाराचे थेट उदाहरण आणि पोलिस दलाची प्रतिमा मलिन करणारा गंभीर गुन्हा आहे.

म्हणजे अशा प्रकार झाला की आम्ही पोलीस प्रशासनामध्ये कार्यरत आहोत तर आम्ही वर्दी घालावी की नाही हा फक्त आमचाच प्रश्न आहे सरकारचा प्रश्न नाही ? आम्ही वर्दी न घालता ही काम करतो भले ते कायदेशीर दृष्ट्या मान्य असो किंवा नसो आम्हाला काही फरक पडत नाही असे विचार असे भ्रष्ट पोलीस प्रशासनामध्ये असलेले अधिकाऱ्यांना वाटतात का? हा खूप गंभीर प्रश्न आहे यामध्ये मग नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवावा ?

हे आता वरिष्ठ अधिकारीच सांगतील की नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवावा वर्दी मधील पोलीस अधिकाऱ्यांवर का बिना वर्दी मधील गाडी अडवणाऱ्या अधिकाऱ्यावर?

Releated Posts

कोंढव्यात पती-पत्नीचा राहत्या घरी मृत्यू; कारण अद्याप अस्पष्ट

प्रतिनिधी पुण्यातील कोंढवा येथील श्रद्धानगर परिसरात एका ५२ वर्षीय व्यक्ती आणि त्याच्या ४८ वर्षीय पत्नीचा त्यांच्या राहत्या घरी…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

पेट्रोलिंगमध्येच उघडकीस आली मोटारसायकल चोरीची टोळी, सराईत चोर पोलिसांच्या ताब्यात वडगाव निंबाळकर पोलिसांची कारवाई

 प्रतिनिधी. वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत निंबूत बारामती रोडवर निंबूत गावचे हद्दीत निंबुत छप्री कॅनॉल येथे पेट्रोलिंग दरम्यान…

ByBymnewsmarathi Jan 7, 2026

वडगाव निंबाळकर पोलीसानी शेतकऱ्यांच्या शेळ्या व बोकड चोरणाऱ्या तिन आरोपींच्या आवळल्या मुसक्या

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत मौजे सदोबाचीवाडी गावाचा हद्दीतील इनामवस्ती होळ रोड येथील तक्रारदार नामे संजय जगन्नाथ…

ByBymnewsmarathi Jan 5, 2026

श्रीरामपूरमध्ये भरदिवसा गोळीबार; बंटी जहागीरदार यांचा मृत्यू

प्रतिनिधी श्रीरामपूर शहरात बुधवारी दुपारी भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. बंटी (असलम शब्बीर) जहागीरदार यांच्यावर…

ByBymnewsmarathi Jan 1, 2026