• Home
  • माझा जिल्हा
  • जीवावर बेतलेल्या आजारावर मेहता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची यशस्वी मात
Image

जीवावर बेतलेल्या आजारावर मेहता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची यशस्वी मात

प्रतिनिधी

बारामती : योग्य वेळी योग्य उपचार मिळाले, तर जीवावर बेतणाऱ्या आजारावरही मात करता येते हे बारामतीतील मेहता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने सिद्ध करून दाखवले आहे.

करण हा केवळ 25 वर्षांचा तरुण. लहानपणापासूनच त्याच्या विविध शारीरिक तक्रारी सुरु होत्या. वडिलांचे निधन झाल्यामुळे आईवरच घराचा भार होता. काही दिवसांपूर्वी त्याला *अर्धांगवायू (पॅरालिसिस)*चा झटका आला. अचानक आलेल्या या संकटामुळे करण व त्याच्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळला. घरात ना नातेवाईकांची मदत, ना आर्थिक आधार.

मेहता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने परिस्थितीची गंभीरता ओळखून त्याला तातडीने दाखल करून घेतले. तपासणीत मेंदूच्या पुढच्या भागात रक्तस्राव झाल्याचे स्पष्ट झाले. ही अवस्था अत्यंत धोकादायक असते. त्याचबरोबर करणला फिट्सचे झटकेही येत होते. अशा वेळी उपचार करणे धोकादायक ठरू शकते, तरीही डॉक्टरांनी धाडस दाखवत तीन दिवस त्याला व्हेंटिलेटरवर ठेवून उपचार सुरु केले.

सोबतच हॉस्पिटलमधील फिजिओथेरपी टीमने सतत थेरपी देत रुग्णाच्या हातपायांची ताकद परत मिळवून देण्यास मदत केली. सर्वसाधारणपणे पॅरालिसिसमधून पूर्ण बरे होणे कठीण असते, मात्र सात दिवसांच्या सातत्यपूर्ण उपचारांनंतर करण पूर्णपणे ठणठणीत बरा झाला आणि डिस्चार्ज घेऊन घरी परतला.

या उल्लेखनीय यशाबद्दल डॉ. विशाल मेहता म्हणाले,
“मेहता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे अत्याधुनिक सुविधांनी युक्त असून, एक्सपर्ट डॉक्टर्स आणि सहकाऱ्यांच्या समर्पित सेवेमुळेच अशक्य वाटणारे उपचार शक्य झाले. आमचे हॉस्पिटल पंचक्रोशीतील रुग्णांसाठी विविध योजना राबवत असून रुग्णसेवेत सदैव तत्पर राहील.”

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026